शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अकोला  जिल्ह्यात केवळ आठ कोटींचे कर्ज वाटप; कर्जमाफीत रब्बी पीक कर्ज वाटपाकडे कानाडोळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 13:33 IST

अकोला : रब्बी हंगामासाठी यावर्षी जिल्ह्यात ६० कोटी ४२ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना, त्या तुलनेत १८ जानेवारीपर्यंत केवळ ८ कोटी ३१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे कर्जमाफीच्या धामधुमीत जिल्ह्यात रब्बी कर्ज वाटपाकडे कानाडोळा करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देयावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६० कोटी ४२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले. १८ जानेवारीपर्यंत उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ८ कोटी ३१ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. रब्बी पीक कर्ज वाटपाचे प्रमाण लक्षात घेता, जिल्ह्यात ५२ कोटी ११ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप अद्याप बाकी आहे.

अकोला : रब्बी हंगामासाठी यावर्षी जिल्ह्यात ६० कोटी ४२ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना, त्या तुलनेत १८ जानेवारीपर्यंत केवळ ८ कोटी ३१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे कर्जमाफीच्या धामधुमीत जिल्ह्यात रब्बी कर्ज वाटपाकडे कानाडोळा करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकºयांना ६० कोटी ४२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले. जिल्ह्यात रब्बी पिकांच्या पेरण्या आटोपल्या असून, १८ जानेवारीपर्यंत उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ८ कोटी ३१ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे; मात्र कर्जमाफीच्या धामधुमीत रब्बी पीक कर्ज वाटपाकडे कानाडोळा करण्यात येत आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत वाटप करण्यात आलेले रब्बी पीक कर्ज वाटपाचे प्रमाण लक्षात घेता, जिल्ह्यात ५२ कोटी ११ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप अद्याप बाकी आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील रब्बी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बँकनिहाय असे करण्यात आले कर्ज वाटप!१८ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात ८ कोटी ३१ लाख रुपयांचे रब्बी पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत ८ कोटी २८ हजार रुपये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ३० लाख ७२ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.रब्बी पीक कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ६० कोटी ४२ लाख रुपये रब्बी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, त्यापैकी आतापर्यंत जिल्ह्यात ८ कोटी ३१ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.-जी.जी. मावळे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणagricultureशेती