शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : जिल्हा प्रशासनामार्फत कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:53 IST

अकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील कपाशी पिकाचे पंचनामे जिल्हा प्रशासनामार्फत गठित पथकांमार्फत सोमवारपासून सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देगुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसानतुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान पिकाचेही नुकसान 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील कपाशी पिकाचे पंचनामे जिल्हा प्रशासनामार्फत गठित पथकांमार्फत सोमवारपासून सुरू करण्यात आले.   राज्यातील अनेक जिल्हय़ांत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान पिकाचेही नुकसान झाले आहे. त्यानुषंगाने कपाशी व धान पिकाचे नुकसान झालेल्या बाधित शेतकर्‍यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी पीक नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याचा आदेश शासनाच्या महसूल विभागामार्फत ७ डिसेंबर रोजी देण्यात आला. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यात  बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले. कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे दहा दिवसांत पूर्ण करून, अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आले आहेत. प्रशासनामार्फत गठित पथकांकडून करण्यात येत असलेल्या पंचनाम्यांमध्ये जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.

‘या’ पथकांकडून करण्यात येत आहेत पंचनामे! कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी तालुका स्तरावर पथके गठित करण्यात आली आहेत. त्यानुसार संबंधित तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांचा समावेश असलेल्या पथकांकडून जिल्ह्यात सातही तालुक्यांतील गावागावांत  कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्यात येणार आहेत. 

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यात झालेल्या कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांकडून सुरू करण्यात आले आहे. पंचनाम्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.- श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणagricultureशेतीcottonकापूस