शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात १६ हजारांवर मतदारांची वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:18 IST

प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार मतदारांची संख्या लक्षात घेता, जिल्ह्यात १६ हजार ३६७ नवीन मतदारांची वाढ झाली आहे.

- संतोष येलकर अकोला : जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी ३१ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यानुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या १५ लाख ७४ हजार ९१ आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी १५ जुलैपर्यंत मतदारांची संख्या १५ लाख ५७ हजार ७२४ होती. प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार मतदारांची संख्या लक्षात घेता, जिल्ह्यात १६ हजार ३६७ नवीन मतदारांची वाढ झाली आहे.जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार यादीनुसार गत १५ जुलैपर्यंत मतदारांची संख्या १५ लाख ५७ हजार ७२४ इतकी होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत गत ३१ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची संख्या १५ लाख ७४ हजार ९१ इतकी आहे. त्यामध्ये ८ लाख १२ हजार १८१ पुरुष, ७ लाख ६१ हजार ८६४ महिला व ४६ इतर मतदारांचा समावेश आहे. म्हणजेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात १६ हजार ३६७ नवीन मतदारांची वाढ झाली आहे.२६०८ मतदारांची नावे वगळली!जिल्ह्यातील अंतिम मतदार यादीतून २ हजार ६०८ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामध्ये मयत व स्थलांतरित मतदारांचा समावेश आहे.१८,९७४ नवीन मतदारांची नावे समाविष्ट!गत १५ जुलैनंतर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणीत १८ हजार ९७४ नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. अंतिम मतदार यादीत या नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली.विधानसभा मतदारसंघनिहाय आता अशी आहे मतदारांची संख्या!मतदारसंघ                             मतदारअकोट                                      २८४८४३बाळापूर                                    २९४४४६अकोला पश्चिम                        ३३११६१अकोला पूर्व                               ३४३४४१मूर्तिजापूर                                ३२०१६०..............................................................एकूण                                       १५७४०९१

 

टॅग्स :Akolaअकोला