शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : देहविक्री प्रकरणातील तिघांची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 01:48 IST

अकोला : सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जठारपेठ येथील ज्योती नगरमध्ये सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाच्या अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखा, शहर पोलीस उपअधीक्षक व सिव्हिल लाइन्स पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली. या तीनही आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींची ७ फेब्रुवारीपर्यंत कारागृहात रवानगी केली.

ठळक मुद्देजठारपेठेतील उच्चवस्तीत चालतोय गोरखधंदा!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जठारपेठ येथील ज्योती नगरमध्ये सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाच्या अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखा, शहर पोलीस उपअधीक्षक व सिव्हिल लाइन्स पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली. या तीनही आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींची ७ फेब्रुवारीपर्यंत कारागृहात रवानगी केली. यामध्ये ग्राहक शेख जावेद शेख लतीफ, विनोद शेषराव पांडे या दोघांसह हा व्यापार चालविणार्‍या दिवाकर नामक महिलेचा समावेश आहे. जठारपेठसारख्या उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या बेकायदेशीर देहविक्री व्यवसायाची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांना मिळाली. बॉडी मसाजच्या नावाखाली या ठिकाणी देहव्यापार चालत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे, शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांचे पथक व सिव्हिल लाइन्सचे ठाणेदार अन्वर शेख यांनी छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. यामध्ये दोन ग्राहक असून, हा व्यवसाय चालविणारी महिला व तीन युवतींचा समावेश आहे. महिलेविरुद्ध पिटा अँक्टच्या कलम ४,५,८  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, तर तीन युवतींवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना सोडण्यात आले आहे. या प्रकरणातील महिला, आरोपी ग्राहक शेख जावेद शेख लतीफ व विनोद शेषराव पांडे या तिघांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

जठारपेठेतील उच्चवस्तीत चालतोय गोरखधंदा!जठारपेठ हा शहरातील उच्च व प्रतिष्ठितांचा रहिवासी परिसर म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, याच परिसरातील एका आलिशान घरामध्ये  देहव्यापार चालविण्यात येत होता. यामध्ये विनोद शेषराव पांडे व शेख जावेद शेख लतीफसारख्या मोठय़ा घरातील व्यक्तींचा सतत ग्राहक म्हणून वावर होता; मात्र पोलिसांनी छापेमारी केल्यानंतर या व्यवसायाचा भंडाफोड झाला असून, विनोद पांडे व शेख जावेद सारख्या आंबट शौकिनांचाही चेहरा समोर आला.

टॅग्स :ArrestअटकAkola cityअकोला शहर