शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : अतिक्रमण विभागाच्या गलथान कारभाराला विभाग प्रमुख जबाबदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:34 IST

अकोला : अतिक्रमण विभागातील गलथान कारभाराला विभाग प्रमुख आत्माराम इंगोले जबाबदार असून, त्यांच्या मनमानी व नियोजनशून्य कारभारामुळे आमचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे ताशेरे या विभागात कार्यरत कर्मचार्‍यांनी स्थायी समिती सभापती बाळ टाले यांना दिलेल्या पत्रात ओढले आहेत.

ठळक मुद्देस्थायी समिती सभापतींना मानसेवी कर्मचार्‍यांचे पत्रविभाग प्रमुखांवर ओढले ताशेरे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अतिक्रमण विभागातील गलथान कारभाराला विभाग प्रमुख आत्माराम इंगोले जबाबदार असून, त्यांच्या मनमानी व नियोजनशून्य कारभारामुळे आमचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे ताशेरे या विभागात कार्यरत कर्मचार्‍यांनी स्थायी समिती सभापती बाळ टाले यांना दिलेल्या पत्रात ओढले आहेत. मनपातील एक वरिष्ठ अधिकारी व विभाग प्रमुख इंगोले यांच्यामुळे मानसेवी कर्मचार्‍यांचे मनोबल ढासळत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते, हे येथे उल्लेखनीय. शहरात अतिक्रमणाच्या समस्येमुळे सर्वसामान्य नागरिकांना वैताग आला असून, रस्त्यावरून धड पायी चालणे मुश्कील झाले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणाची समस्या दूर करण्याची जबाबदारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची असली तरी मनपातील काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी साधलेल्या अर्थपूर्ण चुप्पीमुळे हा विभाग जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचे दिसून येते. अतिक्रमण विभागात अंदाधुंद कारभार माजला असून, अतिक्रमकांजवळून खुलेआम हप्तेखोरी केली जात असल्याची माहिती आहे. या विभागाच्या हप्तेखोरीमुळे अतिक्रमकांचे मनोबल उंचावले असून, मनपाच्या आवारभिंतीलगत व मुख्य रस्त्यांवर अतिक्रमकांनी कब्जा केल्याचे चित्र आहे. मुख्य रस्ते असो वा प्रभागातील अंतर्गत अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकारी निश्‍चित करतात. त्याची अंमलबजावणी करण्याचे काम अतिक्रमण विभागाचे आहे. मागील काही दिवसांपासून अतिक्रमण विभागाला वारंवार सूचना केल्यावरही कारवाई होत नसल्याचा आरोप खुद्द नगरसेवकांकडूनच केला जात आहे. नगरसेवकांच्या भावना व अतिक्रमण विभागाची मुजोरी ध्यानात घेता स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी ३0 जानेवारी रोजीच्या सभेत अतिक्रमण विभागातील सर्व मानसेवी कर्मचार्‍यांचे एक महिन्याचे वेतन कपात करण्याचे निर्देश दिले होते. तसेच विभाग प्रमुख आत्माराम इंगोले यांच्यासह सर्व कर्मचार्‍यांच्या निलंबनाचा प्रस्ताव महासभेत सादर करण्याचे बजावले होते. याप्रकरणी अतिक्रमण विभागातील सर्व मानसेवी कर्मचार्‍यांनी स्थायी समिती सभापती बाळ टाले यांना दिलेल्या पत्रात या विभागाचा गलथान कारभार व वाढलेल्या अतिक्रमणाला विभाग प्रमुख आत्माराम इंगोले यांच्या कामकाजावर गंभीर स्वरूपाचे ताशेरे ओढले आहेत. 

वरिष्ठ अधिकार्‍याकडून पाठराखण का?अतिक्रमण विभागाच्या कामकाजावर थेट मनपा उपायुक्त (विकास) यांचे नियंत्रण राहते. आजरोजी अतिक्रमण विभागाने मनमानी कारभाराचा कळस गाठल्यामुळे शहरात जागा दिसेल त्या ठिकाणी अतिक्रमण निर्माण झाले आहे. या विभागाच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेण्याची जबाबदारी असणार्‍या मनपातील एका वरिष्ठ अधिकार्‍याकडूनच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती आहे.

मानसेवी कर्मचार्‍यांना सोबत घेऊन अतिक्रमण हटविणे अपेक्षित असताना विभाग प्रमुख एकटेच मोहिमेवर निघतात. विभाग प्रमुखांच्या भूमिकेमुळे या विभागातील कर्मचार्‍यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. कर्मचार्‍यांनी दिलेल्या पत्रात या सर्व बाबी नमूद केल्या आहेत. - बाळ टाले,सभापती, स्थायी समिती, मनपा

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका