शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला: यंदाच्या कावड महोत्सवावर कोरोनाचे सावट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 11:00 IST

यंदा कोरोना विषाणूचे सावट लक्षात घेता, या महोत्सवाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- आशिष गावंडे  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: श्रावण महिन्यात शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून अविरत सुरू आहे. येत्या २१ जुलैपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत असून, १७ आॅगस्ट रोजी शेवटचा श्रावण सोमवार आहे. यंदा कोरोना विषाणूचे सावट लक्षात घेता, या महोत्सवाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे हित लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बच्चू कडू तसेच जिल्हा प्रशासन कोणता निर्णय घेतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेला जोपासणाऱ्या पालखी व कावड उत्सवाला यंदा ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. श्रावण महिन्याला प्रारंभ होण्यापूर्वीच या महोत्सवात सहभागी होणाºया शिवभक्तांना कावडच्या तयारीचे वेध लागतात. श्रावण महिन्यातील शेवटच्या चौथ्या सोमवारी गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल घेऊन कावडधारी आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करतात. त्यांच्या स्वागतासाठी अकोलेकर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारून चहा, नाश्ता, फराळ आदी व्यवस्था उभारतात. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातील भाविक अकोल्यात दाखल होत असतात. येत्या २१ जुलैपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होणार असून, यंदा संसर्गजन्य कोरोना विषाणूचे सावट लक्षात घेता पालखी व कावडचे आयोजन करणाºया शिवभक्त मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी एकमेक ांच्या संपर्कात न येण्याची नियमावली असल्यामुळे कावड महोत्सवात हजारोंच्या संख्येने असलेले पालखी व कावडधारी शिवभक्त कसे एकत्र येणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अर्थातच, देशावर आलेले कोरोनाचे संकट व मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बच्चू कडू व जिल्हा प्रशासन काय निर्णय घेतात, याकडे शिवभक्तांचे लक्ष लागले आहे.अकोलेकरांच्या हिताचा व्हावा विचार पावसाळ््यात कोरोनाचा पादुर्भाव वाढत चालला असून, रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शहरातील प्रमुख गणेश मंडळांसोबत संवाद साधत सार्वजनिक उत्सव छोटेखानी स्वरूपात आयोजित करण्याचे आवाहन केले होते. ही बाब पाहता पालकमंत्री ना.बच्चू कडू यांनीसुद्धा अकोलेकरांच्या हिताचा विचार करूनच ठोस निर्णय घ्यावा, असा सूर पालखी व कावडधारी शिवभक्तांमधून उमटू लागला आहे.

शिवभक्तांच्या नैतिक जबाबदारीत वाढकावड महोत्सवाचे आकर्षण असलेल्या सर्वात मोठ्या,आकर्षक व सामाजिक संदेश देणाऱ्यांमध्ये जुने शहरातील शिवभक्त मंडळांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने डाबकी रोडवासी मित्र मंडळ, जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळ, हरिहर शिवभक्त मंडळ, जय भवानी शिवभक्त मंडळांचा समावेश आहे. कावडमध्ये सहभागी होणाºया शिवभक्तांची संख्या व कोरोनाचे सावट पाहता यंदा शिवभक्त मंडळांच्या नैतिक जबाबदारीत वाढ झाल्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाIndian Festivalsभारतीय सणIndian Traditionsभारतीय परंपराcorona virusकोरोना वायरस बातम्या