शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

अकोला : शहरातील मोकाट डुकरे पकडणारा कंत्राटदार पळाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:15 IST

अकोला : शहरात मोकाट डुकरे पकडण्यासाठी मध्य प्रदेशातून आलेल्या कंत्राटदारासह कर्मचार्‍यांना स्थानिक वराह पालकांनी मारहाण केल्यानंतर कंत्राटदार पळून गेला. आजरोजी शहरात मोकाट डुकरांनी उच्छाद मांडला असून, अकोलेकर त्रस्त झाले आहेत. वराह पालकांची हेकेखोर भूमिका पाहता यावर महापालिका प्रशासन व सत्ताधारी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.  

ठळक मुद्देमध्य प्रदेशातून आलेल्या कंत्राटदाराला स्थानिक वराह पालकांनी केली मारहाण वराह पालकांची हेकेखोर भूमिका; महापालिका प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरात मोकाट डुकरे पकडण्यासाठी मध्य प्रदेशातून आलेल्या कंत्राटदारासह कर्मचार्‍यांना स्थानिक वराह पालकांनी मारहाण केल्यानंतर कंत्राटदार पळून गेला. आजरोजी शहरात मोकाट डुकरांनी उच्छाद मांडला असून, अकोलेकर त्रस्त झाले आहेत. वराह पालकांची हेकेखोर भूमिका पाहता यावर महापालिका प्रशासन व सत्ताधारी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.  शहरात मोकाट डुकरांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी यासंदर्भात मनपाच्या सभागृहात ठराव पारित केला होता. शहरात  वराह पालनाचा व्यवसाय करणारे मनपाच्या आस्थापनेवर सफाई कर्मचारी पदावर कार्यरत आहेत. संबंधित वराह पालकांनी डुकरांची शहराबाहेर विल्हेवाट लावावी, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने अनेकदा दिल्या होत्या. त्यानंतर तीन वेळा डुकरे पकडण्याची निविदा प्रकाशित करण्यात आली  होती. वराह पालकांच्या दबावामुळे कोणीही निविदा सादर केली नाही. अखेर एका स्थानिक  कंत्राटदाराच्या माध्यमातून मध्य प्रदेश येथील २0 जणांची चमू डुकरे पकडण्यासाठी शहरात आणण्यात आली होती. महापौर विजय अग्रवाल यांच्या प्रभागातून डुकरे पकडण्यास सुरुवात होत नाही, तोच दुपारी संबंधित कंत्राटदाराला खोलेश्‍वर भागात खदान, कैलास नगर, बापू नगर आदी भागातून आलेल्या ५0 ते ६0 जणांनी महापालिकेच्या  मोहिमेला आडकाठी निर्माण करीत कंत्राटदाराला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या दिवसापासून कंत्राटदाराने काम बंद केले ते आजतागायत कायम आहे. परिणामी मोकाट डुकरांच्या समस्येत वाढ झाली असून, अकोलेकरांना घाण व अस्वच्छतेचा सामना करावा लागत  आहे. 

महापौरांच्या प्रभागातून  कारवाईला प्रारंभशहरातील मोकाट डुकरे पकडण्यासाठी स्थानिक वराह पालकांचा तीव्र विरोध असल्याचे पाहून महापौर विजय अग्रवाल यांनी त्यांच्या प्रभाग ५  मधून डुकरे पकडण्याच्या कारवाईला प्रारंभ केला होता. त्याच दिवशी कंत्राटदाराला मारहाण झाली. त्यानंतर ही कारवाई बंद झाली.

तक्रार दिली पण..मोकाट डुकरे पकडणार्‍या कंत्राटदाराला मनपाचे सहा.आरोग्य अधिकारी अब्दुल मतीन, कोंडवाडा विभाग प्रमुख सुरेश अंभोरे, आरोग्य  निरीक्षकांसह दोन पोलीस कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत मारहाण केली होती, हे येथे उल्लेखनीय. त्यानंतर प्रशासनाने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली. मनपाच्या कारवाईला आडकाठी निर्माण करणार्‍या व्यक्तींवर जरब बसावी, अशी कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नाही, हे विशेष.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका