शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील व्यावसायिक रामप्रकाश मिश्रा यांच्यावर प्राणघातक हल्ला; चाकूने केले वार

By आशीष गावंडे | Updated: August 31, 2024 10:38 IST

दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी केला हल्ला; हल्लेखोर पसार

आशिष गावंडे, अकोला: शहरातील प्रख्यात व्यावसायिक तथा ईगल इन्फ्रा लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी रामप्रकाश मिश्रा यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास मिश्रा यांच्या घराबाहेर घडली. या घटनेत मिश्रा हे गंभीर जखमी झाले असून त्यांना वाहन चालकाने तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती आहे.

व्यावसायिक रामप्रकाश मिश्रा हे शुक्रवारी रात्री दिल्ली येथून अकोल्यात पावणे अकराच्या सुमारास दाखल झाले. चारचाकी वाहनाचा दरवाजा उघडून ते बाहेर येताच त्याठिकाणी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला चढविला.  त्या हल्ल्याचा मिश्रा यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. ही बाब मिश्रा यांच्या वाहन चालकाच्या लक्षात येताच त्याने मिश्रा यांच्याकडे धाव घेतली.  तोपर्यंत हल्ला करून दोन्ही हल्लेखोर दुचाकीने पसार झाले.  वाहन चालकाने मिश्रा यांना रक्तबंबाळ अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी,  खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके त्यांच्या पथकासह मिश्रा यांच्या निवासस्थानी जाऊन परिसराची तपासणी केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. ...........................मिश्रा यांना गंभीर जखमातोंडाला मास्क लावून आलेल्या हल्लेखोराने मिश्रा यांच्यावर चाकूने सपासप वार केले. यामध्ये मिश्रा यांच्या पोटात व छातीच्या बाजूला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोलाbusinessव्यवसाय