शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील ३०८ भूखंडांचे सातबारा शासनाच्या नावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 11:01 IST

 अकोला : शहरातील सार्वजनिक मालकीच्या खुल्या भूखंडांची तपासणी महसूल विभागामार्फत करण्यात आली असून, ३०८ खुल्या भूखंडांचे सात-बारा शासनाच्या नावावर करण्यात आले.

ठळक मुद्देसार्वजनिक मालकीच्या अनेक खुल्या भूखंडांचे (ओपन स्पेस) ‘रेकॉर्ड’ तसेच सात-बारा उपलब्ध नव्हते. खुल्या भूखंडांचे अद्ययावत रेकॉर्ड तयार करण्यात आले असून, सार्वजनिक मालकीच्या ३०८ खुल्या भूखंडांचे ७/१२ शासनाच्या नावे करण्यात आले आहेत. संबंधित ‘रेकॉर्ड’ अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत मनपा आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे.

- संतोष येलकर

 अकोला : शहरातील सार्वजनिक मालकीच्या खुल्या भूखंडांची तपासणी महसूल विभागामार्फत करण्यात आली असून, ३०८ खुल्या भूखंडांचे सात-बारा शासनाच्या नावावर करण्यात आले. यासंदर्भात तयार करण्यात आलेली अद्ययावत माहिती (रेकॉर्ड) अकोला उप विभागीय अधिकारी कार्यालयामार्फत महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे.अकोला शहरात विविध भागात ‘लेआउट’मधील सार्वजनिक मालकीच्या अनेक खुल्या भूखंडांचे (ओपन स्पेस) ‘रेकॉर्ड’ तसेच सात-बारा उपलब्ध नव्हते. त्यानुषंगाने शहरातील सार्वजनिक मालकीच्या खुल्या भूखंडांवर अतिक्रमण होऊ नये, तसेच भूखंड ताब्यात घेण्याचे गैरप्रकार टाळण्यासाठी शहरातील सार्वजनिक मालकीच्या भूखंडांची तपासणी करून अद्ययावत ‘रेकॉर्ड’ तयार करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी अकोल्याचे उप विभागीय अधिकाऱ्यांना तीन महिन्यांपूर्वी दिला होता. त्यानुसार शहरातील सार्वजनिक मालकीच्या भूखंडांची तपासणी महसूल मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या पथकांमार्फत करण्यात आली. या तपासणीत घेण्यात आलेल्या माहितीनुसार खुल्या भूखंडांचे अद्ययावत रेकॉर्ड तयार करण्यात आले असून, सार्वजनिक मालकीच्या ३०८ खुल्या भूखंडांचे ७/१२ शासनाच्या नावे करण्यात आले आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील या भूखंडांची अद्ययावत माहिती आणि ७/१२ शासनाच्या नावे करण्यात आल्याचे संबंधित ‘रेकॉर्ड’ अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत मनपा आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे.प्रत्येक भूखंडाचा तयार होणार नकाशा!शहरातील सार्वजनिक मालकीच्या ३०८ खुल्या भूखंडांचे ७/१२ शासनाच्या नावे करण्यात आले असून, यामधील प्रत्येक भूखंडाचा नकाशा महसूल विभागामार्फत तयार करण्यात येणार आहे.फलक लावणार; तारेचे कुंपणही घेणार!सार्वजनिक मालकीचे भूखंड बळकावण्याचे प्रकार होऊ नये, तसेच अतिक्रमण होऊ नये, यासाठी शहरातील खुल्या भूखंडांवर फलक (बोर्ड) लावणे, तसेच तारेचे कुंपण घेण्याची उपाययोजनादेखील महसूल विभागामार्फत प्रस्तावित आहे.सार्वजनिक मालकीचे भूखंड बळकावण्याचे गैरप्रकार होऊ नयेत तसेच अतिक्रमण होऊ नये, यासाठी शहरातील खुल्या भूखंडांची तपासणी करण्यात आली असून, ३०८ भूखंडांचे सात-बारा शासनाच्या नावावर करण्यात आले. या भूखंडांच्या अद्ययावत माहितीचे रेकॉर्ड तयार करण्यात आले आहे.- आस्तिककुमार पाण्डेयजिल्हाधिकारीजिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार शहरातील सार्वजनिक मालकीच्या खुल्या भूखंडांची तपासणी करण्यात आली. ३०८ भूखंडांचे सात-बारा शासनाच्या नावे करण्यात आले असून, यासंदर्भात तयार करण्यात आलेले अद्ययावत माहितीचे रेकॉर्ड मंगळवारी महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे.- संजय खडसेउपविभागीय अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहरAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेयAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका