शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सबबीखाली टॅक्सची रक्कम जमा करण्याकडे अकोलेकरांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 10:36 IST

अनेकांनी मालमत्ता कराची थकबाकी जमा करण्याकडे सपशेल पाठ फिरविल्याचे समोर आले आहे.

अकोला: शहरातील धनाढ्य नागरिकांकडेच मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराची रक्कम थकीत असल्याची माहिती असून, कोरोना व्हायरसच्या सबबीखाली अनेकांनी मालमत्ता कराची थकबाकी जमा करण्याकडे सपशेल पाठ फिरविल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे मनपासमोर आर्थिक संकट निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. ही रक्कम वसूल न केल्यास मनपाचा प्रशासकीय कारभार ठप्प पडण्याची चिन्हे आहेत.महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्तांचे १९९८ पासून ते २०१६ पर्यंत पुनर्मूल्यांकन रखडले होते. २०१६ पूर्वी मनपाच्या दप्तरी ७१ हजार मालमत्ता होत्या. प्रशासनाने केलेल्या मूल्यांकनानंतर त्यामध्ये वाढ होऊन १ लाख ४ हजार व हद्दवाढ झालेल्या क्षेत्रात ५० हजार अशा एकूण १ लाख ५४ हजार मालमत्तांची नोंद करण्यात आली. यापासून मनपाला दरवर्षी ७० कोटींचे उत्पन्न प्राप्त होण्याचा प्रशासनाला अंदाज होता. चालू व थकीत मालमत्ता कराच्या एकूण १३५ कोटींपैकी आजवर मालमत्ता कर वसुली विभागाने केवळ ४० कोटींची वसुली केली आहे. उर्वरित ९५ कोटी रुपये जमा करण्यासाठी प्रशासनाला रात्रंदिवस घाम गाळावा लागणार असून, तूर्तास ही थकबाकी जमा करण्यास अकोलेकरांनी आखडता घेतल्याने मनपासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

मनपाची संथ गती; सर्वोच्च न्यायालयात आव्हान नाहीच!मनपाच्या मालमत्ता कराची संपूर्ण प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा निर्वाळा देत नागपूर उच्च न्यायालयाने वर्षभराच्या आत नवीन कर मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे मनपाला निर्देश दिले. सात महिन्यांचा कालावधी होत आला तरी अद्यापही मनपाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले नाही. प्रशासनाच्या संथ गतीचा परिणाम थकबाकी वसुलीवर होत असल्याचे बोलल्या जात आहे.

पथकांचे गठन; कारवाईला ‘खो’महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी ५२ पथकांचे गठन करीत १६० कर्मचाऱ्यांचा समावेश केला होता. थकबाकीदारांमध्ये सर्वाधिक भरणा शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, राजकारणी, डॉक्टर, विधिज्ञ, व्यापाऱ्यांसह उद्योजकांचा असून, संबंधितांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारलाच नसल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या