शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : एकरी प्रमाणात अडकली हरभरा खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 01:11 IST

अकोला: हरभरा उत्पादकतेचे एकरी प्रमाण कृषी विभागामार्फत प्राप्त नसल्याने, ‘नाफेड’ मार्फत हरभरा खरेदी अद्याप सुरू करण्यात आली नाही. सरासरी उत्पादकतेच्या आधारे एकरी हरभरा खरेदीचे प्रमाण प्राप्त झाले नसल्याने आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात हरभरा खरेदी अडकली आहे. नाफेडमार्फत हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आली नसल्याने, बाजारात मिळणाºया कमी दरात हरभरा विकण्याची वेळ जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतक-यांवर आली आहे.

ठळक मुद्दे कमी दरात हरभरा विकण्याची शेतक-यांवर आली वेळ

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: हरभरा उत्पादकतेचे एकरी प्रमाण कृषी विभागामार्फत प्राप्त नसल्याने, ‘नाफेड’ मार्फत हरभरा खरेदी अद्याप सुरू करण्यात आली नाही. सरासरी उत्पादकतेच्या आधारे एकरी हरभरा खरेदीचे प्रमाण प्राप्त झाले नसल्याने आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात हरभरा खरेदी अडकली आहे. नाफेडमार्फत हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आली नसल्याने, बाजारात मिळणाºया कमी दरात हरभरा विकण्याची वेळ जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकºयांवर आली आहे.आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत प्रतिक्विंटल ४ हजार हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल दराने हरभरा खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी ‘आॅनलाइन’ नोंदणी सुरू करण्यात आली आहे; परंतु नाफेडमार्फत हरभरा खरेदीत शेतकºयांकडून एकरी किती हरभरा खरेदी करावी, यासंदर्भात हरभरा उत्पादकतेचे एकरी प्रमाण शासनाच्या कृषी विभागामार्फत अद्याप प्राप्त झाले नाही. त्यामुळे नाफेडमार्फत हरभरा खरेदी अद्याप सुरू करण्यात आली नाही. रब्बी हंगामातील हरभरा पिकाच्या कापणीनंतर, तयार करण्यात आलेला हरभरा शेतकºयांच्या घरात आला आहे. महिन्याचा कालावधीत उलटून गेला; मात्र नाफेडमार्फत हरभरा खरेदी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे बाजारात मिळणाºया कमी दरात हरभरा विकण्याची वेळ जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकºयांवर आली आहे. त्यामुळे हरभरा उत्पादकतेचे एकरी प्रमाण कृषी विभागामार्फत केव्हा प्राप्त होणार आणि नाफेडमार्फत आधारभूत किंमत दराने हरभरा खरेदी केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

उत्पादकता प्रमाणाची प्रतीक्षा!हरभरा उत्पादकतेचे एकरी प्रमाण प्राप्त झाल्यानंतर जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयार्फत जिल्ह्यात नाफेडमार्फत हरभरा खरेदीसाठी सहा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी शेतकºयांकडून एकरी किती हरभरा खरेदी करावी, यासंदर्भात हरभरा उत्पादकतेच्या एकरी प्रमाणाची प्रतीक्षा केली जात आहे.

तूर खरेदी केंद्रांवरच होणार हरभरा खरेदी!नाफेडमार्फत जिल्ह्यात अकोला, तेल्हारा, पिंजर, पातूर, वाडेगाव व पारस या सहा खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्यात येत आहे. उत्पादकतेचे एकरी प्रमाण प्राप्त झाल्यानंतर तूर खरेदीच्या केंद्रांवरच हरभरा खरेदी सुरू करण्यात येणार आहे.

कृषी विभागामार्फत हरभरा उत्पादकतेचे एकरी प्रमाण प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात ‘नाफेड’ मार्फत हरभरा खरेदीसाठी सहा खरेदी सुरू करण्यात येतील. तूर खरेदी केंद्रांवरच हरभरा खरेदी सुरू करण्यात येणार आहे.- राजेश तराळे,  जिल्हा मार्केटिंग अधिकारी 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीMarketबाजार