शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : ११० कोटींच्या विकास कामांना ‘ब्रेक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 16:02 IST

जिल्ह्यातील ११० कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीतील विविध विकास कामांना ‘ब्रेक’ लागणार आहे.

अकोला :  आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ११० कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीतील विविध विकास कामांना ‘ब्रेक’ लागणार आहे.जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत २०१९-२० या वर्षात जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी १५९ कोटी रुपयांचा निधी शासनामार्फत मंजूर करण्यात आला आहे. मंजूर निधीतून जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्ते, इतर जिल्हा मार्ग, जनसुविधा अंतर्गत कामे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे, मृद व जलसंधारण, नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत विकास कामे, नगरोत्थान योजनेंतर्गत कामे, प्राथमिक शाळा इमारतींची बांधकामे, प्राथमिक आरोग्य केंद्र-उपकेंद्र इमारतींचे बांधकाम व देखभाल-दुरुस्ती, अंगणवाडीची बांधकामे, यात्रा स्थळांचा विकास, ऊर्जा विकास व इतर विकास कामे प्रस्तावित आहेत. मंजूर निधीपैकी संबंधित विभागांमार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांनुसार आॅगस्ट अखेरपर्यंत ४८ कोटी २४ लाख ८८ हजार रुपयांच्या विकास कामांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ११० कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीची कामे मार्गी लागणे अद्याप बाकी आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर नवीन विकास कामे करता येणार नाहीत. त्यानुषंगाने निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ११० कोटी ७६ लाख रुपयांच्या विविध विकास कामांना ‘ब्रेक ’ लागणार आहे. 

 

टॅग्स :Akolaअकोला