शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : डीझल खरेदी-विक्रीमध्ये घोळ घालणारे महाबीजमधील दोघे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 01:39 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज)मधील अधिका-यांच्या वाहनांमध्ये डीझल घोटाळा करून ९७३ लीटर डीझलची हेराफेरी करणाºया दोघांना महाबीज प्रशासनाने निलंबित केले आहे; मात्र फौजदारी कारवाई करताना महाबीज प्रशासनाने केवळ पेट्रोल पंप संचालकांची नावे देऊन कर्मचाºयांना वाचविण्यासाठी अर्धवट कारवाई केल्याने यामध्ये महाबीजचे अधिकारीही सहभागी असल्याचा संशय वाढला आहे.

ठळक मुद्देमहाबीजची अर्धवट कारवाई संशयास्पद २७ बनावट पावत्यांद्वारे ९७३ लिटर डिझलचा अपहार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज)मधील अधिका-यांच्या वाहनांमध्ये डीझल घोटाळा करून ९७३ लीटर डीझलची हेराफेरी करणाºया दोघांना महाबीज प्रशासनाने निलंबित केले आहे; मात्र फौजदारी कारवाई करताना महाबीज प्रशासनाने केवळ पेट्रोल पंप संचालकांची नावे देऊन कर्मचा-यांना वाचविण्यासाठी अर्धवट कारवाई केल्याने यामध्ये महाबीजचे अधिकारीही सहभागी असल्याचा संशय वाढला आहे.महाबीजमध्ये कार्यरत असलेल्या काही कर्मचाºयांनी २७ बनावट पावत्यांच्या आधारे ९७३ लीटर डीझलचा अपहार केला होता. या प्रकरणात महाबीज प्रशासनाने केलेल्या विभागीय चौकशीत घोटाळा झाल्याचे उघड झाले, त्यानंतर खदान पोलीस ठाण्यात मे. एम. आर. वजीफदार अ‍ॅण्ड सन्स पेट्रोल पंप व कर्मचारी राजेशमळी पारसनाथ तिवारीविरुद्ध तक्रार देण्यात आली. यामध्ये सहभागी असलेल्या कर्मचाºयांवर मात्र फौजदारी कारवाई करण्यासाठी महाबीज प्रशासनाने अर्धवट कारवाई केल्याचे दिसून येत आहे. महाबीज प्रशासनाने त्यांचे दोन शिपाई प्रफुल्ल शेगावकर व सुभाष इंगळे यांच्याकडून अपहाराची प्रत्येकी २० हजार रुपये वसुली केली व त्यांना निलंबित केले. या प्रकरणामध्ये वसुली झाल्यानंतर प्रकरण तिथेच न थांबवता महाबीज प्रशासनाने पोलिसांत तक्रार देताना या कर्मचाºयांना मात्र वगळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महाबीजचे सहायक व्यवस्थापक प्रबोध धांदे यांच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी मे. एम. आर. वजीफदार अ‍ॅण्ड सन्स पेट्रोल पंप व कर्मचारी राजेशमळी पारसनाथ तिवारीविरुद्ध भादंविचे कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे; मात्र या प्रकरणात दोषी आढळणाºया कर्मचाºयांना वगळले. पेट्रोल पंपावर एकतर्फी कारवाई केल्यामुळे हे प्रकरण आता महाबीजवर शेकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाMahabeejमहाबीज