शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत भंडारा, यवतमाळचे संघ विजयी, सिद्धेश वाठ, मिनार सहारे सामनावीर

By atul.jaiswal | Updated: May 5, 2024 13:41 IST

Akola Cricket News: जिल्हा हौशी क्रिकेट संघटना, अकोला व अकोला क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत रविवार, ५ मे रोजी पार पडलेल्या दोन सामन्यांमध्ये भंडारा संघाने वाशिम संघाला, तर यवतमाळ संघाने गोंदिया संघाला पराभूत केले.

- अतुल जयस्वालअकोला - जिल्हा हौशी क्रिकेट संघटना, अकोला व अकोला क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत रविवार, ५ मे रोजी पार पडलेल्या दोन सामन्यांमध्ये भंडारा संघाने वाशिम संघाला, तर यवतमाळ संघाने गोंदिया संघाला पराभूत केले.

अकोला क्रिकेट क्लब मैदानावर खेळविल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भंडारा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १९.३ षटकांमध्ये सर्व बाद १३३ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना वाशिम संघाला २० षटकांमध्ये ९ गडी गमावून केवळ १३० धावा करता आल्या. त्यामुळे संघाला ३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात ५८ धावा करणारा भंडाऱ्याचा सलामीवीर फलंदाज सिद्धेश वाठ हा सामनावीर ठरला. पंच म्हणून आशिष सोळंके व संजय बुंदेले, तर स्कोअरर म्हणून नीलेश लखाडे यांनी काम पाहिले.

उमरी येथील स्व. अरुण दिवेकर क्रीडांगणावर खेळविल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात यवतमाळ संघाने नाणेफेकचा कौल जिंकुन प्रथम फलंदाजीस करत १९.५ षटकांमध्ये सर्व गडी गमावत १३६ धावा उभारल्या. धावांचा पाठलाग करताना वाशिम संघाला १६ षटकांमध्ये सर्व गडी गमावत केवळ ७९ धावाच करता आल्या. ५७ धावांनी त्यांना पराभव स्विकारावा लागला. चार षटकांमध्ये केवळ चार धावा देत चार फलंदाजांना बाद करणारा यवतमाळचा गोलंदाज मिनार सहारे हा सामनावीर ठरला. पंच म्हणून अनिल एदलाबादकर व संदीप कपूर, तर स्कोअरर म्हणून सावरमल शर्मा यांनी काम पाहिले.

टॅग्स :Akolaअकोला