लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वसतिगृहात राहणार्या अल्पवयीन मुलीस पळवून नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या युवकाविरुद्ध शुक्रवारी सायंकाळी बलात्कारासह पॉस्कोनुसार गुन्हा दाखल केला. शहरातील एका वसतिगृहामध्ये राहणार्या या मुलीची बंजारा नगरात राहणार्या हरीश राठोड नामक युवकाशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. भेटीगाठी सुरू झाल्या. गुरूवारी हरीश राठोडने तिच्या वसतिगृहावर जात, तिला पळवून नेले. या प्रकरणात मुलीच्या आईने तक्रार दिली. रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी अपहरणाचा गुन्हा युवकावर दाखल केला. पोलिसांनी मुलीचा शोध घेतला, शहरातील एका भागात दोघेही सा पडले. पोलिसांनी मुलगी व युवकास ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. या ठिकाणी मुलीचा जबाब नोंदविण्यात आला. मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्याने, पोलिसांनी हरीश राठोड याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ व पॉस्कोनुसार गुन्हा दाखल केला.
अकोला : वसतिगृहातील पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:25 IST
अकोला : वसतिगृहात राहणार्या अल्पवयीन मुलीस पळवून नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या युवकाविरुद्ध शुक्रवारी सायंकाळी बलात्कारासह पॉस्कोनुसार गुन्हा दाखल केला.
अकोला : वसतिगृहातील पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार
ठळक मुद्देलैंगिक अत्याचार करणार्या युवकाविरुद्ध बलात्कारासह पॉस्कोनुसार गुन्हा दाखल