शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची चाचणी अकोल्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 11:22 IST

या चाचणीत प्रायोगिक तत्त्वावर शेतकºयांच्या बँक खात्यात एक रुपया इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे.

- संतोष येलकरअकोला: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील थकबाकीदार शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची चाचणी शासनामार्फत घेण्यात येणार आहे. ही चाचणी घेण्यासाठी शासनामार्फत अकोला जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी १२ फेबु्रवारी रोजी घेण्यात येणाºया या चाचणीत प्रायोगिक तत्त्वावर शेतकºयांच्या बँक खात्यात एक रुपया इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत गत १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत कर्ज थकीत असलेल्या राज्यातील शेतकºयांसाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील थकबाकीदार शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या गावनिहाय याद्या २१ फेबु्रवारी रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी घेण्यासाठी शासनामार्फत अकोला जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, १२ फेबु्रवारी रोजी घेण्यात येत असलेल्या या चाचणीत प्रायोगिक तत्त्वावर पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात एक रुपया इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.तालुकास्तरीय गठित होणार तक्रार निवारण समित्या!कर्जमाफी योजनेंतर्गत राज्यातील जिल्हानिहाय कामाचा आढावा ७ फेबु्रवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे घेतला. कर्जमाफी संदर्भात शेतकºयांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुका स्तरावर तक्रार निवारण समित्या गठित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार कर्जमाफी संदर्भात शेतकºयांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अकोला जिल्ह्यासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्या गठित करण्यात येणार आहेत.कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी घेण्यासाठी शासनामार्फत अकोला जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या चाचणीत प्रायोगिक तत्त्वावर शेतकºयांच्या बँक खात्यात एक रुपया इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे.-संजय खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी