शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Akola: चिंताजनक! अकोला जिल्ह्यातील ९ महसूल मंडळांत २६ दिवसांपासून पाऊसच नाही

By रवी दामोदर | Updated: September 5, 2023 18:26 IST

Akola: पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या वाटेवर असून, शेतकरी चिंतित आहेत. जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी तब्बल ९ महसूल मंडळात दि.२५ जुलै ते ५ सप्टेंबरपर्यंत अशा २६ दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याचे वास्तव आहे.

- रवी दामोदर अकोला - पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या वाटेवर असून, शेतकरी चिंतित आहेत. जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी तब्बल ९ महसूल मंडळात दि.२५ जुलै ते ५ सप्टेंबरपर्यंत अशा २६ दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याचे वास्तव आहे. त्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात कोरडा दुष्काळ घोषित करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

जिल्ह्याचे तापमान ३५.६ अंशांवर गेले असल्याने पिके करपणे सुरू झाली आहेत. त्यामुळे बहरलेल्या पिकाची वाटचाल आता दुष्काळाकडे चालली असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत चिंतेचे ढग दाटले आहेत. यंदाच्या खरिपात जिल्ह्यात ४.२० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६१ टक्के पाऊस बरसला असून, तब्बल ३९ टक्के पावसाची तूट आहे.

तापमान ३६.२ अंशांवर, पिके करपण्यास सुरुवातजुलै महिन्यात व ऑगस्ट महिन्यात पावसाचा प्रदीर्घ खंड राहिला आहे. पावसाचा खंड असल्याने पिके धोक्यात आली आहेत. त्यात सप्टेंबर महिन्याला सुरुवात होताच तापमानातही वाढ झाली असून, पिकांनी माना टाकल्या आहेत. काही भागांत पिके करपण्यास सुरुवात झाली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. मंगळवारी जिल्ह्याचे तापमान ३६.२ अंशांवर असून, दुपारच्या सुमारास जिवाची लाही-लाही झाली.

टॅग्स :Akolaअकोलाweatherहवामानmonsoonमोसमी पाऊस