शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : आहुजा, मोटवाणी फर्मची प्राप्तिकर खात्याकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 01:40 IST

अकोला : कोलकाता येथील शेअर बाजारात संशयास्पद उलाढाल करणार्‍या फर्ममध्ये अकोल्यातील आहुजा आणि मोटवाणी हे  उद्योजक आढळल्याने प्राप्तिकर विभागाने या उद्योजकांच्या ग्रुपमधील २१ प्रतिष्ठानांवर एकाच वेळी सर्च सुरू केला. नागपूरच्या प्राप्तिकर विभागाच्या २00 अधिकार्‍यांनी बुधवारी सकाळी सहा वाजतापासून आहुजा आणि मोटवाणी परिवाराच्या कोठडी बाजार, न्यू किराणा बाजार, अलंकार मार्केट, कॉटन मार्केट आणि एमआयडीसीतील फर्मचा ताबा घेतल्याने व्यापारी वतरुळ हादरले आहे.

ठळक मुद्देअकोल्यातील व्यापारी हादरले२00 अधिकार्‍यांची टीम 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोलकाता येथील शेअर बाजारात संशयास्पद उलाढाल करणार्‍या फर्ममध्ये अकोल्यातील आहुजा आणि मोटवाणी हे  उद्योजक आढळल्याने प्राप्तिकर विभागाने या उद्योजकांच्या ग्रुपमधील २१ प्रतिष्ठानांवर एकाच वेळी सर्च सुरू केला. नागपूरच्या प्राप्तिकर विभागाच्या २00 अधिकार्‍यांनी बुधवारी सकाळी सहा वाजतापासून आहुजा आणि मोटवाणी परिवाराच्या कोठडी बाजार, न्यू किराणा बाजार, अलंकार मार्केट, कॉटन मार्केट आणि एमआयडीसीतील फर्मचा ताबा घेतल्याने व्यापारी वतरुळ हादरले आहे.या  दोन्ही ग्रुपच्या बेहिशेबी मालमत्ताची तपासणी करण्यासाठी नागपूर प्राप्तिकर विभागाचे सहायक संचालक मुदलियार यांच्या नेतृत्वात बुधवारी सकाळी सहा वाजता एकाच वेळीही सर्च मोहीम सुरू झाली. विविध खासगी वाहनातून आलेल्या प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांनी अकोल्यातील एकूण २१ फर्मचा एकाच वेळी ताबा घेतला. पोलीस बंदोबस्तात हा ताबा घेण्यात आल्याने ही बाब वार्‍यासारखी शहरात पसरली. सकाळी सहा वाजता सुरू झालेली सर्च मोहीम काही ठिकाणी सायंकाळी थांबविली गेली, तर काही ठिकाणी वृत्त लिहेपर्यंत ही सर्च मोहीम सुरूच होती. नागपूर-अकोलासह विदर्भातील विविध ठिकाणचे अधिकारी या मोहिमेत प्रामुख्याने सहभागी झाले होते. या व्यवहारातील स्टेट ब्रोकर राजेश प्रेमानी याला सर्वप्रथम अधिकार्‍यांनी सोबत घेतले. त्यानंतर ही सर्च मोहीम सुरू झाली.

प्राप्तिकरचे ‘डीआय’ काजला येणार!आहुजा आणि मोटवाणी यांच्या सर्च मोहिमेत मोठे घबाड आढळून आल्याची माहिती वरिष्ठांकडे पोहोचल्याने प्राप्तिकर विभागाचे  तपास संचालक (डायरेक्टर ऑफ इन्व्हेस्टीगेशन ) काजला  गुरूवारी अकोल्यात येत आहेत. शहरातील एका मोठय़ा हॉटेलमध्ये त्यांच्या नावे कक्ष आरक्षित करण्यात आला आहे. तोपर्यंत नागपूर प्राप्तिकर विभागाचे सहआयुक्त मुदलियार यांच्या नेतृत्वात अधिकार्‍यांची टीम अकोल्यात तळ ठोकून सर्च मोहीम सुरू ठेवणार आहे.

कोलकाता शेअर बाजारातील उलाढालीमुळे उजेडात आले घबाड!कोलकाता येथील शेअर मार्केटच्या स्टॉकमध्ये संशयास्पद उलाढाल करणार्‍या देशभरातील फर्मची चौकशी प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांनी सुरू केली.  नोटाबंदीच्या कार्यकाळात पाच कोटी रुपयांच्या मुद्रांकाच्या खरेदीचा संशयास्पद व्यवहार करणार्‍यांमध्ये मोटवाणी ग्रुप आढळून आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरIncome Taxइन्कम टॅक्स