शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : स्वयंरोजगार निर्मितीवर कृषी विद्यापीठाचा भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:26 IST

अकोला : विदर्भातील शेतकरी, शेतकर्‍यांच्या पाल्यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्या, तसेच स्वत:चे कृषी पूरक प्रक्रिया उद्योग उभे राहावेत, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. एक महिना हे प्रशिक्षण अकोला येथे दिले जाणार आहे. याकरिता केंद्र सरकारच्या भारतीय कृषी कौशल्य परिषदेने आर्थिक सहाय्य केले आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या कृषी कौशल्य परिषदेचा सहयोग एक महिना देणार प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भातील शेतकरी, शेतकर्‍यांच्या पाल्यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्या, तसेच स्वत:चे कृषी पूरक प्रक्रिया उद्योग उभे राहावेत, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. एक महिना हे प्रशिक्षण अकोला येथे दिले जाणार आहे. याकरिता केंद्र सरकारच्या भारतीय कृषी कौशल्य परिषदेने आर्थिक सहाय्य केले आहे.बदलत्या जागतिक परिस्थितीत भारतीय शेती व्यवसायाला गती देण्यासाठी शेतीपूरक जोडधंद्यांचे जाळे गुंफल्याशिवाय वैदर्भीय शेती शाश्‍वत आणि शेतकरी संपन्न होण्याचे स्वप्न कृतीत येणार नाही. त्यासाठी उपलब्ध संसाधनांवर आधारित कृषिपूरक जोडधंद्यांची निवड व कौशल्यप्राप्ती निर्णायक ठरणार आहे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अनेक उपक्रम राबविले असून, विविध संस्थांच्या सहयोगाने स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे आयोजन वर्षभर करण्यात येते. कौशल्यप्राप्ती नंतर आपले स्वत:चे उद्योग उभारून स्वयंपूर्ण झालेले व इतरांना रोजगार देण्यास सक्षम झालेले अनेक तरुण यशस्वी उद्योजक झाले आहेत.   या अनुषंगाने या कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या विभागाच्यावतीने अकोला येथे दिल्ली येथील भारतीय कृषी कौशल्य परिषदेच्या सहयोगाने एक महिना कालावधीच्या स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे आयोजन  २ ते ३0 जानेवारी २0१८ दरम्यान करण्यात आले आहे.  यामध्ये माळी प्रशिक्षण हा स्वयंरोजगार प्रशिक्षणाचा विषय असून, विदर्भातील रहिवासी असलेले जे तरुण मुले-मुली स्वयंरोजगार करू इच्छितात, अशा तरुणांकरिता सदर प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. प्रवेशासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता वर्ग ५ वा उत्तीर्ण असावा. तसेच २0 डिसेंबर २0१७ रोजी उमेदवारांचे वय १६ ते ३0 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.सदर प्रशिक्षणामध्ये हिरवळ तयार करणे, हिरवळीचे व्यवस्थापन करणे, विविध फुले व शोभीवंत झाडांचे अभवृद्धी करणे, रोप वाटिकेचे व्यवस्थापन करणे व रोप वाटिकेतील विविध रोपे व कलमांची निर्मिती करणे व त्यांची निगा राखणे, तसेच फुलांची मूल्यवृद्धी आदी बाबींवर भर देण्यात येणार आहे. 

केंद्र सरकारच्या भारतीय कृषी कौशल्य परिषदेच्या सहयोगाने आयोजित या प्रशिक्षणासाठी इच्छुक विदर्भातील तरुणांनी २0 डिसेंबरपयर्ंत उद्यानविद्या विभाग अकोला येथे संपर्क साधावा. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येईल.- डॉ. डी.एम. पंचभाई, विभागप्रमुख, उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ.

टॅग्स :Dr. Punajabrao Deshmukh Agriculture Collegeपंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयAkola cityअकोला शहर