शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

Akola: १६ मेपूर्वी कापूस बियाण्याची विक्री केल्यास होणार कारवाई! कृषी विभागाचे आदेश

By रवी दामोदर | Updated: May 6, 2024 16:09 IST

Akola News: राज्यात  २०१७ च्या खरीप हंगामातील शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भावाचा अनुभव लक्षात घेऊन त्यानंतर कृषी विभागाकडून राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणात आढळून आला. यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी क्षेत्रिय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

- रवी दामोदर अकोला - राज्यात  २०१७ च्या खरीप हंगामातील शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भावाचा अनुभव लक्षात घेऊन त्यानंतर कृषी विभागाकडून राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणात आढळून आला. यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी क्षेत्रिय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी दि. १६ मे २०२४ पासून कापूस बियाणे  शेतकऱ्यांना उपलब्ध होणार  आहे. त्यापूर्वी बियाण्याची विक्री केल्यास संबंधित कंपनी, किरकोळ विक्रेत्यावर कारवाई होणार आहे. यासंदर्भात कृषी विभागाने विभागीय कृषी सहसंचालक यांना आदेशित केले आहे.

कापूस शास्त्रज्ञांच्या मतानुसार शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रम खंडीत न झाल्याने प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. हंगामपुर्व कापूस लागवड झाल्यास शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रमास पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेत यंदा शेंदरी बोंड अळीच्या प्रार्दुभावास आळा घालण्याकरीता हंगामपूर्व कापसाची लागवड होणार नाही. या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दि. १६ मेपासून कापूस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन प्रत्यक्ष लावगड ही १ जून २०२४ नंतरच होणार आहे. कटाक्षाने पालन केल्यास शेंदरी (गुलाबी) बोंड अळीचा प्रादुर्भाव प्रभावीपणे नियंत्रीत करणे शक्य होणार आहे. याकरीता क्षेत्रीयस्तरावर कटाक्षाने पालन करणे बाबत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी काटेकोर नियोजन करुन अंमलबजावणी करावी व विभागीय कृषि सहसंचालक यांनी त्यावर सनियंत्रण ठेवावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. कापूस बियाणे पुरवठा करणेबाबत निर्देशित दिनांक पुढीलप्रमाणे

१. उत्पादक कंपनी ते वितरक ०१ मे २०२४ ते १० मे २०२४.

२. वितरक ते किरकोळ विक्रेता १० मे २०२४ नंतर

३. किरकोळ विक्रेता ते शेतकरी १५ मे २०२४ नंतर

४. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लागवड १ जूननंतर 

कापूस बियाण्याची विक्री दुकानदार यांनी शेतकऱ्यांना १५ मे नंतर करता येईल, परंतु शेतकरी बांधवांनी सेंद्रिय बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता १ जून नंतरच बियाण्याची लागवड करावी. - शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र