शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : ‘लीज’ वरील ७७ भूखंडधारकांनी केला अटी-शर्तींचा भंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 13:22 IST

​​​​​​​अकोला : शहरातील शासन मालकीच्या नझुलच्या भाडेपट्ट्यावर (लीज) देण्यात आलेल्या भूखंडांची तपासणी महसूल विभागामार्फत पूर्ण करण्यात आली असून, त्यामध्ये ७७ भूखंडधारकांनी अटी व शर्तींचा भंग केल्याचे आढळून आले आहे.

ठळक मुद्देभाडेपट्ट्यावर देण्यात आलेल्या शहरातील १२८ भूखंडांची तपासणी महसूल मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या पथकांमार्फत पूर्ण करण्यात आली.अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार भाडेपट्ट्यावरील ७७ भूखंडधारकांनी अटी व शर्तींचा भंग केल्याचे आढळून आले आहे. भाडेपट्ट्यावरील संबंधित भूखंडधारकांविरुद्ध महसूल विभागामार्फत लवकरच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

- संतोष येलकर

अकोला : शहरातील शासन मालकीच्या नझुलच्या भाडेपट्ट्यावर (लीज) देण्यात आलेल्या भूखंडांची तपासणी महसूल विभागामार्फत पूर्ण करण्यात आली असून, त्यामध्ये ७७ भूखंडधारकांनी अटी व शर्तींचा भंग केल्याचे आढळून आले आहे. अटी-शर्तींचा भंग करणाऱ्या भूखंडधारकांविरुद्ध महसूल विभागामार्फत लवकरच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.अकोला शहरातील विविध ठिकाणी शासन मालकीच्या नझुलच्या जमिनीवरील भूखंड निवासी, वाणिज्यीक व औद्योगिक इत्यादी प्रयोजनासाठी भाडेपट्ट्यावर देण्यात आले आहेत. अटी व शर्तींना अधीन राहून भाडेपट्ट्यावर देण्यात आलेल्या शहरातील १२८ भूखंडांची तपासणी महसूल मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या पथकांमार्फत पूर्ण करण्यात आली असून, तपासणीचा अहवाल अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार भाडेपट्ट्यावरील ७७ भूखंडधारकांनी अटी व शर्तींचा भंग केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अटी-शर्तींचा भंग करणाºया भाडेपट्ट्यावरील संबंधित भूखंडधारकांविरुद्ध महसूल विभागामार्फत लवकरच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.अटी-शर्तींचा असा करण्यात आला भंग !भाडेपट्ट्यावर देण्यात आलेल्या भूखंडांच्या ७७ प्रकरणांत संबंधित भूखंडधारकांनी अटी व शर्तींचा भंग केला आहे. त्यामध्ये जागेच्या वापरात (प्रयोजन) बदल ,महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेता भूखंडाची विक्री करणे व भूखंडधारकाच्या नावात बदल करणे इत्यादी प्रकारच्या अटी व शर्तींचा भंग करण्यात आला आहे.१.१० कोटींचा दंड वसूल!शहरातील शासन मालकीच्या जमिनीवरील भाडेपट्ट्यावर देण्यात आलेल्या भूखंडांपैकी अटी व शर्तींचा भंग केल्याच्या प्रकरणात गत दोन महिन्यात (२८ मार्चपर्यंत ) २५ भूखंडधारकांकडून १ कोटी १० लाख ५६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.शहरातील नझूलच्या जमिनीवरील भाडेपट्ट्यावर देण्यात आलेल्या १२८ भूखंडांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यामध्ये ७७ भूखंडधारकांनी अटी व शर्तींचा भंग केल्याचे आढळून आले आहे. शासन निर्णयानुसार अटी-शर्तींचा भंग करणाºया भाडेपट्ट्यावरील भूखंडधारकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.-संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका