शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : ४७ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, दोन आरोपी जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:47 IST

अकोला : गुरांसाठी चारा गोळा करीत असलेल्या एका ४७ वर्षीय महिलेस शेतातील अधिक चारा देण्याचे आमिष दाखवित बाश्रीटाकळी येथील दोघांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

ठळक मुद्देगुरांचा चारा देण्याचे आमिषप्रकरण बाळापूर पोलिसांकडे वर्ग 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गुरांसाठी चारा गोळा करीत असलेल्या एका ४७ वर्षीय महिलेस शेतातील अधिक चारा देण्याचे आमिष दाखवित बार्शीटाकळी येथील दोघांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. महिलेवर झालेल्या अत्याचाराचे घटनास्थळ बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दधम शेतशिवार असल्याने खदान पोलिसांनी हे प्रकरण बाळापूर पोलिसांकडे वर्ग केले आहे.मध्यवर्ती बसस्थानकामागील परिसरात रहिवासी असलेली ४७ वर्षीय महिला रोजप्रमाणे घरच्या गुरांसाठी चारा गोळा करण्यासाठी गेली होती. यावेळी बार्शीटाकळी येथील रहिवासी सय्यद बिलाल सय्यद मेहबूब व सागर ऊर्फ अविनाश वैराळे या दोघांना ही महिला दिसली. त्यांनी महिलेला शेतातील चारा देण्याचे आमिष देत तिला दुचाकीवर दधम शेतशिवारात घेऊन गेले. या ठिकाणी त्यांनी महिलेवर शारीरिक अत्याचार केला. घडलेला प्रकार कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही या दोघांनी महिलेला दिली. त्यामुळे महिलेने या प्रकरणाची वाच्यता केली नाही. मात्र, पत्नी चिंतेत असल्याचे पतीच्या लक्षात येताच, त्याने पत्नीला विचारणा केली, असता पत्नीने घडलेला प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर दोघेही खदान पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले, महिलेसोबत घडलेला प्रकार तिने खदानचे ठाणेदार संतोष महल्ले यांना सांगितला. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांनी खदान पोलीस स्टेशन गाठले. या दोन्ही आरोपींवर खदान पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली, तर  दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी सय्यद बिलाल व अविनाश वैराळे या दोघांना अटक केली. घटनास्थळ बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याने झीरोची नोंद करून प्रकरण बाळापूर पोलिसांकडे वर्ग केले.

सय्यद बिलाल आरोपीया प्रकरणातील सय्यद बिलाल याच्यावर यापूर्वीही विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, तर अविनाश वैराळे हा वाहन दुरुस्तीचे काम करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या दोघांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलीस जप्त करणार आहेत. सय्यद बिलाल व अविनाश वैराळे या दोघांनीही अत्याचार केल्यानंतर पिडीत महिलेला फोन आल्यावर त्यांनी महिलेजवळील मोबाइल हिसकावून तो बंद करून पुन्हा कुठेही वाच्यता न करण्याची  धमकी दिल्याचेही समोर आले आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणBalapurबाळापूरKhadan Police Stationखदान पोलीस स्टेशनRapeबलात्कार