शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

२३३ धाेकादायक इमारतीत ११५६ रहिवासी; मरण्याची हाैस नाही, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 10:39 IST

Akola News : वडिलाेपार्जित संपत्तीत हक्काचा हिस्सा मिळावा, या उद्देशातून बहुतांश रहिवासी इमारत खाली करीत नसल्याची माहिती आहे.

अकाेला : शहरातील २३३ शिकस्त व जीर्ण इमारतींमधील सुमारे ११५६ रहिवाशांच्या जीविताला धाेका आहे. पावसाळ्यात अशा धाेकादायक इमारती काेसळण्याची दाट शक्यता लक्षात घेता महापालिका प्रशासनाने संबंधितांना नाेटिसा बजावून औपचारिकता निभावली असली तरी इमारतींमधील रहिवासीदेखील नानाविध अडचणींचा सामना करीत असल्याचे चित्र आहे. वडिलाेपार्जित संपत्तीत हक्काचा हिस्सा मिळावा, या उद्देशातून बहुतांश रहिवासी इमारत खाली करीत नसल्याची माहिती आहे. यामुळे परिसरातील इतरही रहिवाशांच्या जीवाला धाेका निर्माण झाला आहे.

महापालिका क्षेत्रात धाेकादायक व शिकस्त इमारतींची माेठी संख्या आहे. अशा इमारतींचे मनपाच्या नगररचना विभागाकडून दरवर्षी सर्वेक्षण केले जाते. तसेच इमारतींमधील मालमत्ताधारकांना नाेटिसा बजावून औपचारिकता निभावली जाते. नाेटीस प्राप्त झाल्यानंतरही मालमत्ताधारक इमारत साेडत नाहीत. अनेकांचे वडिलाेपार्जित हक्क, दावे-प्रतिदावे असून न्यायालयात सदर प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. यातील काही इमारतींमध्ये मागील ४० ते ५० वर्षांपासून ठाण मांडलेल्या भाडेकरूंनीही हक्क दाखल केले आहेत. अर्थात, या सर्व कारणांमुळे मरणाची टांगती तलवार असूनही नाइलाजाने मालमत्ताधारकांचा शिकस्त व जीर्ण झालेल्या इमारतींमध्ये मुक्काम आहे.

 

झाेननिहाय शिकस्त इमारती

पूर्व झाेन - ६८

पश्चिम झाेन - ९५

उत्तर झाेन - ७०

 

दक्षिण झाेनमध्ये सर्वे सुरूच!

पावसाळा ताेंडावर आल्यानंतरही दक्षिण झाेनमधील शिकस्त इमारतींचा सर्वे सुरूच असल्याची माहिती आहे. दरम्यान, उर्वरित तीनही झाेनमधील धाेकादायक इमारतींमधील रहिवाशांना नाेटिसा बजावण्यात आल्या आहेत.

 

सारे काही कळते, पण कुठे जाणार?

इमारत शिकस्त असली तरी आमच्या संपत्तीचा वाद न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे हक्काच्या लढाईसाठी जीव धाेक्यात घालून या ठिकाणी राहत आहे.

- युसूफ शेख

 

वडिलांच्या संपत्तीत सामायिक हिस्सेदारी आहे. परंतु आपसात बेबनाव असल्याने काेणीही इमारत खाली करण्यास तयार नाहीत. त्यामुळे नाइलाजाने या ठिकाणी राहत आहे.

- दिनेश भट्टड

 

या इमारतीमध्ये भाडेतत्वानुसार आमच्या दाेन पिढ्यांचे वास्तव्य गेले. आता तीसरी पिढी राहत आहे. आम्ही घर साेडल्यास जायचे काेठे, असा सवाल आहे.

- प्रवीण मिश्रा

 

वारंवार दिल्या नाेटिसा

शहरात सर्वाधिक धाेकादायक इमारती पश्चिम झाेन व त्यापाठाेपाठ उत्तर झाेनमध्ये आहेत. आम्ही रहिवाशांना नाेटिसा दिल्यानंतरही ते इमारत साेडत नसल्याची माहिती झाेन अधिकारी राजेंद्र टापरे यांनी दिली.

 

इमारत पडल्यास जबाबदार काेण?

पावसाळ्यात धाेकादायक इमारती काेसळण्याची शक्यता राहते. अशा इमारती उभ्या असल्यामुळे परिसरातील इतर रहिवाशांच्या जीवितालाही धाेका निर्माण झाला आहे. मनपाने नाेटिसा देऊन औपचारिकता निभावली असली तरी इमारत पडल्यास जबाबदार काेण, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका