शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
5
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
6
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
7
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
8
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
9
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
10
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
11
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
12
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
13
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
14
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
15
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
16
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
17
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
18
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
19
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
20
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

अकोला : अपघातात चार दिवसांत ११ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 02:31 IST

अकोला : अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग, अकोला ते अकोट रोडवरील चोहोट्टा बाजार  तसेच पातूर घाटात झालेल्या वेगवेगळय़ा अपघातात गत चार दिवसांमध्ये ११ जणांचा बळी गेल्याचे  धक्कादायक वास्तव आहे. गत चार दिवसांमध्ये अचानकच अपघातांची मालिका वाढली असून,  यामध्ये ११ च्यावर वाहनचालक व प्रवासी ठार झाले आहेत.

ठळक मुद्देरस्त्यांनी घेतला बळीप्रशासनाला जाग येईना

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग, अकोला ते अकोट रोडवरील चोहोट्टा बाजार  तसेच पातूर घाटात झालेल्या वेगवेगळय़ा अपघातात गत चार दिवसांमध्ये ११ जणांचा बळी गेल्याचे  धक्कादायक वास्तव आहे. गत चार दिवसांमध्ये अचानकच अपघातांची मालिका वाढली असून,  यामध्ये ११ च्यावर वाहनचालक व प्रवासी ठार झाले आहेत.अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्गावर गत दोन दिवसांत झालेल्या अपघातात सात जण ठार  झाले आहेत, तर पातूर घाटात रविवारी रात्री झालेल्या अपघातात एक जण ठार झाला आहे.  यासोबतच विटांच्या मिनी ट्रकखाली येऊन एक जण जागेवरच ठार झाल्याची घटना चोहोट्टा बाजार  परिसरात शनिवारी घडली. सोमवारी दुपारी शिवणी विमानतळाजवळ झालेल्या अपघातात तीन जण  ठार झाले असून, बडनेराजवळील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अपघातात नागपुरा तील चार जण जागेवरच ठार झाले आहेत. बोरगाव मंजूजवळ आल्टो कार व टँकरच्या अपघातात  नागपूर जिल्हय़ातील कन्हान येथील दोघे जण जागेवरच ठार झाले होते. अशा प्रकारे गत चार  दिवसांमध्ये चाहोट्टा बाजार, पातूर घाट, बोरगाव मंजू, लोणी व शिवणी विमानतळाजवळ झालेल्या  अपघातात ११ जण ठार झाले असून, पाचच्यावर प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी  रुग्णांलयामध्ये उपचार सुरू आहेत.

रस्त्याच्या चाळणीमुळे अपघात वाढले!रस्त्यावर पडलेल्या मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे अपघाताचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढल्याची माहिती  समोर आली आहे. अकोला-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसांत झालेले अपघात हे  केवळ रस्त्यावरील खड्डय़ांमुळे झाल्याचे वास्तव आहे. तसेच चोहोट्टा बाजार येथील अपघातही रस् त्यावरील खड्डे वाचविताना झाल्याचे प्रत्यक्षदश्रींनी सांगितले. यासोबतच पातूर घाटातील अपघा तालाही रस्त्यावरील खड्डेच जबाबदार असल्याने सार्वजनिक बांधकाम खाते व राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरणच्या दुर्लक्षामुळेच या ११ जणांचा बळी गेल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम वभागाचे दावे फोलसार्वजनिक बांधकाम विभागाने १५ डिसेंबरपूर्वी राज्यातील पूर्ण रस्त्यांवरील खड्डे बुजविणार  असल्याच्या घोषणा मोठा गाजावाजा करून करण्यात आल्या होत्या; मात्र अकोला जिल्हय़ातील  परिस्थिती विदारक असून, एकाही रस्त्यावरील खड्डा बुजविण्यात आला नसून, उलट १५  डिसेंबरनंतर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या ११ जणांच्या मृत्यूला सार्वजनिक बांधकाम विभाग  व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार असून, त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याची मागणी होत  आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणAkola cityअकोला शहरAccidentअपघात