शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

दहा महिन्यांपासून ‘एमआयडीसी’चे विभागीय अधिकारी पद रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 15:05 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अमरावती विभागाचे प्रमुख अधिकारी पद गेल्या आॅगस्ट महिन्यांपासून रिक्त आहे.

ठळक मुद्देअमरावतीपेक्षा जास्त महसूल असूनही गेल्या अनेक वर्षांपासून अकोल्यातील आरओ कार्यालयाची मागणी पूर्ण झालेली नाही. अमरावतीसह अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ या पाचही जिल्ह्यांतील उद्योजकांची अनेक विकासांची कामे रेंगाळली आहेत. उद्योगमंत्री देसाईंसह लोकप्रतिनिधींचेही लक्ष उद्योजकांच्या तक्रारींकडे नसल्याने शासनाप्रती रोष व्यक्त होत आहे.

- संजय खांडेकर

अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अमरावती विभागाचे प्रमुख अधिकारी पद गेल्या आॅगस्ट महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे अमरावतीसह अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ या पाचही जिल्ह्यांतील उद्योजकांची अनेक विकासांची कामे रेंगाळली आहेत. एकीकडे शासन ‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’च्या घोषणा करीत असून, दुसरीकडे मात्र दहा-दहा महिने पूर्णवेळ अधिकारीदेखील मिळत नसल्याने उद्योजकांमध्ये शासनाविरुद्ध प्रचंड असंतोष खदखदत आहे.अमरावती विभागात सर्वात जास्त महसूल देणाºयांमध्ये अकोला एमआयडीसीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. अमरावतीपेक्षा जास्त महसूल असूनही गेल्या अनेक वर्षांपासून अकोल्यातील आरओ कार्यालयाची मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेकडो उद्योजकांना अमरावतीऐवजी थेट नागपूर गाठावे लागत आहे. अकोला एमआयडीसीत मध्यंतरी फुडएक्स्पो पार पडले. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई प्रामुख्याने उपस्थित होते. त्यावेळी राज्यमंत्री देसाई यांच्यासमोर अकोल्यातील उद्योजकांनी पाणी प्रश्नापासून तर आरओ कार्यालयातील अडचणींवर लक्ष वेधले होते. तेंव्हा देसाई यांनी अमरावतीला तातडीने अधिकारी देण्याची आणि प्रत्येक आठवड्यातून एक दिवस हे अधिकारी अकोल्यात मुक्कामी राहणार असल्याची घोषणा केली होती. ही घोषणा मात्र पूर्णत: हवेत विरली आहे. अमरावती विभागाला पूर्णवेळ अधिकारी तर मिळालाच नाही, उलटपक्षी संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यांतील उद्योजकांना आता प्रत्येक बाबींचा पाठपुरावा करण्यासाठी नागपूर गाठावे लागत आहे.अकोल्याच्या एमआयडीसीतील आॅनलाइन प्लॉट वितरण प्रणालीत घोटाळा झाल्याच्या तक्रारी मुंबईपर्यंत गाजल्या असूनही उद्योगमंत्री अकोल्याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. प्लॉट मिळण्यासाठी लांबलचक यादी तयार असून, उद्योजक त्रस्त आहेत. उद्योगमंत्री देसाईंसह लोकप्रतिनिधींचेही लक्ष उद्योजकांच्या तक्रारींकडे नसल्याने शासनाप्रती रोष व्यक्त होत आहे.-राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अमरावती येथील आरओचे रिक्त पद तातडीने भरण्याचे सांगितले होते. ही प्रक्रिया प्रशासकीय बाबींवर सुरू आहे. गेल्या दहा महिन्यांपासून विदर्भातील ११ जिल्ह्यांचा प्रभार माझ्याकडे आहे.-संगीतराव, विभागीय अधिकारी एमआयडीसी, नागपूर.- दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नसल्याने उद्योगमंत्री देसाई यांना स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे. त्यात आरओ कार्यालयातील अधिकारी आणि उद्योजकांना होत असलेल्या त्रासाबाबतही अवगत करण्यात आले आहे.-कैलास खंडेलवाल, अध्यक्ष, एमआयडीसी, इंडस्ट्रिज असो. अकोला

टॅग्स :AkolaअकोलाAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळ