शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

Akoka: जिल्ह्यात कांद्याची खेडा खरेदीच; अनुदान मिळणार कसे? अनुदानासाठी शेतकऱ्यांना बाजार समितीत कांदा विक्री करणे आवश्यक

By रवी दामोदर | Updated: April 25, 2023 12:35 IST

Akoka News: अकोला जिल्ह्यात बहुतांश शेतकरी जाग्यावरच कांद्याची विक्री करतात. कांद्याची खेडा खरेदीचे प्रमाण ९० टक्क्यांवर असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान कसे मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.

- रवी दामोदर अकोला -  कांद्याचे बाजारभाव पडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य शासनाने कांदा बाजारभावातील घसरण व उपाययोजना आणली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले. परंतु त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती अथवा नाफेडकडे दि. १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये कांदा विक्री करणे आवश्यक आहे. दुसरीकडे, जिल्ह्यात बहुतांश शेतकरी जाग्यावरच कांद्याची विक्री करतात. कांद्याची खेडा खरेदीचे प्रमाण ९० टक्क्यांवर असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान कसे मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.

ज्या शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या दोन महिन्यातील काळात कांदा विकला त्यांनाच अनुदान मिळणार आहे. कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांनी कांदा विक्री पावती, सात बारा उतार आणि बॅंक खात्याच्या माहितीसह ज्या बाजार समितीत कांदा विक्री केला त्या बाजार समितीत अर्ज करावा, लागणार आहे. परंतु जिल्ह्यातील शेतकरी थेट बाजार समितीत कांद्याची विक्री न करता ते शेतात जाग्यावरच व्यापाऱ्यांना विक्री करतात. अशा शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात ९० ते ९५ टक्क्यांवर आहे. आतापर्यंत अकोला बाजार समितीत अनुदानासाठी एकही अर्ज प्राप्त न झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यानंतरही जिल्ह्यातील शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.

साडेसहा हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची पेरणीयंदा जिल्ह्यात पावसाळा चांगला झाल्याने सिंचनासाठी तलाव, कुपनलिका, विहिरी, प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याला पसंती दिली. जिल्ह्यात तब्बल ६ हजार ६०३ हेक्टर क्षेत्रावर कांद्याची पेरणी केली आहे.

अवकाळीमुळे नुकसान, खर्चही निघेनाबाजारात कांद्याचे दर घसरल्याने खर्चही वसूल होत नसल्याचे चित्र आहे. त्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असून, मोठ्या प्रमाणात कांदा सडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कांदा शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

टॅग्स :onionकांदाAkolaअकोला