शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अकोटातील ‘ती’ वृक्षतोड अवैध!

By admin | Updated: July 14, 2017 01:09 IST

‘एसडीओं’च्या निवासस्थानातील झाडे नगरपालिकेची परवानगी न घेताच तोडली!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट येथील उपविभागीय अधिकारी यांच्या निवासस्थानामध्ये करण्यात आलेल्या वृक्षतोडीला अकोट नगर परिषदेने रीतसर परवानगीच दिली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पपूर्ती सप्ताहात शासकीय अधिकाऱ्यांनी कायदेशीर पूर्तता न करता केलेली वृक्षतोड ही अवैध असल्याचे स्पष्ट होत आहे. स्थानिक सिंधी कॅम्प परिसरात महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांचे शासकीय निवासस्थान आहे. या परिसरातील आठ हिरव्यागार झाडांची कत्तल केल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आली आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी यांचे शासकीय निवासस्थान हे सार्वजनिक बांधकाम विभाग अकोट यांच्या अखत्यारीत येते. त्यामुळे येथील देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने निवासस्थान परिसरातील निंबाचे तीन वाळलेले वृक्ष असल्याचे दाखवित १ जुलै रोजी विश्रामगृहावर लिलाव केला; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने वृक्षतोडबाबत नगर परिषदेची कुठलीही अधिकृत परवानगी न घेता लिलाव केल्यानंतर वृक्षतोड करण्यात आली आहे. वास्तविक पाहता नागरी क्षेत्रात वाळलेले, जळलेले किंवा कोणत्याही प्रकारचे वृक्ष तोडण्याची परवानगी देण्याचे अधिकार नगर परिषदेला आहेत. त्याकरिता नगर परिषदेकडे वृक्षतोडीबाबतचा अर्ज करून रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. नगर परिषदेकडे वृक्षतोडीबाबत अर्ज केल्यानंतर तो अर्ज वृक्ष प्राधिकरण समितीसमोर ठेवण्यात येतो. समितीचे सचिव मुख्याधिकारी हे अर्जावरून स्थळ पाहणी, झाड तोडण्यायोग्य किंवा छाटण्यायोग्य आहे का, याबाबतचा अहवाल तयार करण्यात येतो. त्यानंतर वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन तसेच झाड तोडणे आवश्यक असलेल्या झाडावर ठळक अक्षरात नोटिस लावून आक्षेप मागविण्यात येतात. चौकशीअंती अहवाल वृक्ष प्राधिकरण समितीसमोर ठेवण्यात येतो. त्यानंतर समितीने मंजुरात दिल्यानंतर मुख्याधिकारी हे वृक्ष तोडण्याची परवानगी देण्याची कायद्यात तरतूद आहे; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने नगर परिषदेकडे कोणताही अर्ज न करता परवानगी घेतली नाही. सर्व कायदे धाब्यावर बसवत तीन निंबाच्या झाडांचा लिलाव १ जुलै रोजी केल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या निवासस्थानात आठ वृक्षांची कत्तल करून घेतल्याची गंभीर घटना घडली आहे. दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांनी वृक्षतोडीची परवानगी मागितल्यास त्यांना लवकर देण्यात येत नाही. अवैध वृक्षतोड केल्यास कारवाईचा बडगा उगारल्या जातो. याप्रकरणी नगर परिषद आता चौकशीअंती काय कार्यवाही करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उपविभागीय अधिकारी यांच्या निवासस्थानात करण्यात आलेल्या वृक्षतोडीची नगर परिषदेकडून परवानगी देण्यात आली नाही. परवानगीकरिता कुठलाही अर्ज प्राप्त झालेला नाही. - गीता ठाकरे,मुख्याधिकारी तथा वृक्ष अधिकारी नगर परिषद अकोट.