शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात अक्षयतृतीयेला सराफा बाजारात पाच कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 14:39 IST

अकोला : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर अकोलेकरांनी बुधवारी पाच कोटी रुपयांची खरेदी केली.

ठळक मुद्देअकोल्यातील सुवर्णकार आणि सराफांनी पसंतीचे दागिने मुबलक प्रमाणात ठेवले होते. मागील आठवड्यात सोन्याचे भाव ३०,८०० रुपये प्रतिग्रॅम होते. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अकोला सराफा बाजारात तेजी होती.

अकोला : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर अकोलेकरांनी बुधवारी पाच कोटी रुपयांची खरेदी केली. अक्षयतृतीयेच्या निमित्ताने सोन्याचे भाव वधारण्याची शक्यता होती. मात्र, ३१६०० प्रतिग्रॅमचे भाव कायम राहिले. सकाळपेक्षा बुधवारी सायंकाळी सोने खरेदीसाठी अकोलेकर बाहेर पडलेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अकोला सराफा बाजारात तेजी होती.दसरा, दिवाळी, गुढीपाडवा आणि  अक्षयतृतीया या साडेतीन मुहूर्ताला सोन्याची खरेदी शुभ समजली जाते. त्यामुळे या साडेतीन मुहूर्तावर देशभरात मोठी उलाढाल होते. अकोल्यातही कोटींच्या घरात सोन्याची एका दिवसात उलाढाल होत असल्याचा इतिहास आहे. त्यामुळे सराफा बाजार आधीच मंगळवारपासून सज्ज होता. दागिन्यांची रेंज, नाणी, मूर्ती यांना जास्त पसंती असल्याने अकोल्यातील सुवर्णकार आणि सराफांनी पसंतीचे दागिने मुबलक प्रमाणात ठेवले होते. मुंबई आणि अकोल्याच्या सोन्याच्या भावात अनेकांना तफावत जाणवली. याबाबत एका ज्वेलरी संचालकास विचारणा केली असता ३१६०० सह मेकिंग आणि जीएसटी चार्ज वेगळा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील आठवड्यात सोन्याचे भाव ३०,८०० रुपये प्रतिग्रॅम होते. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील व्यवहारामुळे सोन्याचे भाव वधारलेले होते. पण, त्याचा खरेदीदारावर कोणताही परिणाम दिसून आला नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाGoldसोनंAkshaya Tritiyaअक्षय तृतीया