शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोपचारमधील वातानुकूलन यंत्रणा ‘व्हेंटिलेटर’वर!

By admin | Updated: April 17, 2017 02:09 IST

अतिदक्षता विभागातील ‘एसी’ बंदच : कुलर बनले शोभेच्या वस्तू

अकोला : सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केल्यामुळे दिवसेंदिवस तापमान वाढतच असून, गत काही दिवसांत पारा ४४ अंश सेल्सिअसवर गेला आहे. उष्म्याने सर्वसामान्यांच्या जीवाची काहिली होत असताना, सर्वोपचार रुग्णालयातील वातानुकूलन यंत्रणा मात्र ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचे चित्र आहे. अतिदक्षता विभागातील (आयसीयू) ९ पैकी ७ एसी बंद आहेत, तर अनेक वॉर्डांमधील कुलर हे केवळ शोभेच्या वस्तू म्हणून उभे असल्याने रुग्णांचे प्रचंड उकाळ्याने हाल होत आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. सर्वोपचारमध्ये रुग्णांना उकाड्यापासून दिलासा मिळावा, यासाठी असलेली यंत्रणा मात्र कुचकामी ठरली आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरातील तापमान प्रचंड वाढले आहे. गत दोन दिवसांपासून पारा ४४ डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. प्रचंड तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे; परंतु सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात लावलेले वातानुकूलन यंत्र प्रचंड तापमानातही बंद आहेत. गंभीर आजारी रुग्णांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात हलविण्यात येते. या ठिकाणी १२ खाटा असून, या ठिकाणी नऊ वातानुकूलन यंत्र लावलेले आहेत; परंतु यापैकी केवळ दोनच यंत्र सुरू आहेत. तापमान वाढत असल्याने रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या सोयीसाठी वातानुकूलन यंत्र आणि कुलर सुरू करायला हवे होते; परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रुग्णांना उकाड्यात उपचार घ्यावे लागत आहेत. रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.उष्माघात कक्षातील कुलर बंदउष्णतेची लाट असल्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांसाठी सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्र. ९ मध्ये उष्माघात कक्ष उघडण्यात आला आहे. या कक्षात दाखल होणाऱ्या रुग्णांना शीतलता मिळावी, यासाठी कुलरची व्यवस्था असणे अनिवार्य असते. सदर कक्षामध्ये कुलर आहे; परंतु रविवारी दुपारच्या सुमारास या कक्षात रुग्ण दाखल असतानाही कुलर बंद असल्याचे दिसून आले. अनेक कुलरमध्ये पाणीच नाही!सर्वोपचार रुग्णालयातील सर्वच कक्षांमध्ये कुलर बसविण्यात आले आहेत. रुग्णांना उष्म्याचा त्रास होऊ नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली असली, तरी ती कुचकामी ठरत आहे. बहुतांश कक्षांमधील कुलरमध्ये पाणीच नसल्याचे चित्र आहे. पाण्याअभावी हे कुलर उष्ण हवा फेकत असल्यामुळे रुग्णांना त्याचा त्रासच होतो. कुलरमध्ये पाणी टाकण्याची जबाबदारी कक्ष सेवकांची आहे; परंतु मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे कुलरमध्ये पाणी भरल्या जात नसल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. ‘आयसीयू’मधील वातानुकूलन यंत्रे वारंवार नादुरुस्त होतात. नवीन यंत्रे खरेदी करण्याचे अधिकार महाविद्यालय प्रशासनास नाहीत. याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला आहे. कुलरमध्ये पाणी टाकण्याची जबाबदारी कक्ष सेवकांकडे आहे; मात्र मनुष्यबळाचा अभाव आहे.- डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्रभारी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला