शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅग्रोटेक कृषी महोत्सवाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 13:11 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत आयोजित पाच दिवसीय अ‍ॅग्रोटेक कृषी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

अकोला : काही वर्षांपूर्वी शेतीसाठी गोधनाचा उपयोग व्हायचा; परंतु आता त्याची जागा यंत्राने घेतली आहे. उन्नत शेती आणि आर्थिक परिस्थिती बळकट करायची असेल, तर शेतकºयांना शेतीपूरक व्यवसाय करणे आवश्यक आहे, तरच शेतकºयांचे भविष्य असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत आयोजित पाच दिवसीय अ‍ॅग्रोटेक कृषी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विलास भाले होते. याप्रसंगी मनपा आयुक्त संजय कापडणीस, याप्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, अधिष्ठाता अभियांत्रिकी डॉ. महेंद्र नागदेवे, निम्न कृषी शिक्षण विभागाचे अधिष्ठाता डॉ. धनराज उंदीरवाडे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर, कुलसचिव, डॉ. प्रकाश कडू, प्रकल्प संचालक, आत्मा राजेंद्र निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रदीप बोरकर यांनी केले. आभार विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी मानले.अ‍ॅग्रोटेकच्या निमित्ताने नव्या संशोधनाची ओळखअ‍ॅग्रोटेकच्या माध्यमातून कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नव्या शेती तंत्रज्ञानाची ओळख शेतकºयांना करून देता आली. शिवाय, या तंत्रज्ञानाला व्यवसायाची सांगड कशी घालावी, यासंदर्भात शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहितीदेखील यावेळी कुलगुरू डॉ. भाले यांनी अध्यक्षीय भाषणातून दिली.उन्नत शेतीसाठी कृषी प्रदर्शनाची गरजभविष्यातील उन्नत शेती व्यवसायासाठी अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनाची गरज असल्याचे प्रतिपादन अकोला महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी केले.विविध स्पर्धांमध्ये विजेत्यांचा सत्कारशासकीय गटामध्ये प्रथम क्रमांक जिल्हा रेशीम कार्यालय, द्वितीय क्रमांक सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), तृतीय क्रमांक जिल्हा पशुसंवर्धन विभागाला मिळाला. निमशासकीय गटात प्रथम उद्यानविद्या विभाग, द्वितीय कीटकशास्त्र विभाग आणि तृतीय मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाने पटकावला. कृषी विज्ञान केंद्र गटात प्रथम कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, द्वितीय कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली आणि तृतीय कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी पटकावला. स्वयं साहाय्यता बचत गटात दुर्गामाता स्वयं साहाय्यता बचत गट, सिद्धार्थ महिला स्वयं साहाय्यता बचत गट, ग्रामविकास स्वयं साहाय्यता बचत गट यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAgrotech 2017 Akolaअ‍ॅग्रोटेक २0१७ अकोला