शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

अ‍ॅग्रोटेक २0१७ : विषमुक्त शेतीला प्रोत्साहन; ३१0 दालनात विविध माहिती उपलब्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:00 AM

अकोला: पिकांवरील विविध कीड, रोगांचे आक्रमण व त्यावर वापरण्यात येणारे विविध कीटकनाशकांचा वापर बघता, शेतकर्‍यांना विषयुक्त धान्य,भाजीपाल्याचीच खरेदी करावी लागत आहे. यातून शेतकर्‍यांनी बाहेर पडण्यासाठी या कृषी प्रदर्शनातून विषमुक्त सेंद्रिय शेती व यांत्रिकीकरणाचा संदेश देण्यात आला आहे. चार डोममधील ३१0 दालनात इतर संशोधनासोबतच सेंद्रिय शेती तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकर्‍यांचा कल दिसून आला.

ठळक मुद्देकृषी प्रदर्शनात शेतकर्‍यांची रेलचेल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पिकांवरील विविध कीड, रोगांचे आक्रमण व त्यावर वापरण्यात येणारे विविध कीटकनाशकांचा वापर बघता, शेतकर्‍यांना विषयुक्त धान्य,भाजीपाल्याचीच खरेदी करावी लागत आहे. यातून शेतकर्‍यांनी बाहेर पडण्यासाठी या कृषी प्रदर्शनातून विषमुक्त सेंद्रिय शेती व यांत्रिकीकरणाचा संदेश देण्यात आला आहे. चार डोममधील ३१0 दालनात इतर संशोधनासोबतच सेंद्रिय शेती तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकर्‍यांचा कल दिसून आला.या  प्रदर्शनामध्ये एकूण ४ मोठे डोम उभारण्यात आले असून, पहिल्या डोममध्ये कृषी विद्यापीठांतर्गत विविध विभागांची दालने थाटण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, शास्त्रोक्त कापूस लागवड तंत्रज्ञान प्रामुख्याने प्रदर्शित करण्यात येणार आहे. विषमुक्त शेतीला अधिक प्रोत्साहन देत सेंद्रिय शेती पद्धतीचा पुरस्कारसुद्धा यंदाचे एक वैशिष्ट्य आहे. कौशल्यावर आधारित शेती हे यंदाच्या प्रदर्शनाचे ब्रिद राहणार असून, यामध्ये केवळ पीक वाण, तांत्रिक शिफारशीपुरते र्मयादित न राहता शेतीपूरक व्यवसाय ज्यामध्ये पशुपालन, जातिवंत गायी, म्हशी, कोंबड्या, बकरी, वराह पालनासह चारा उत्पादन, कमी प्रतीच्या चार्‍याची मूल्यवृद्धी, दुग्धपदार्थ निर्मिती व विक्री यांचा समावेश आहे. फळ प्रक्रिया उद्योगात जाम, जेली, स्क्वॉश, सिरप, लोणचे आदींसह जांभूळ, केळी, संत्रे, लिंबू, सीताफळ, द्राक्ष, पपई, पेरू, आवळा आदी फळ पिकांचे मूल्यवृद्धी साधण्याचे तंत्र उपलब्ध आहे.  सोबतच अतिशय अभिनव शेती अवजारे, यंत्रे, सूक्ष्म सिंचन पद्धती, ट्रॅक्टर, कापणी पश्‍चात मूल्यवर्धन करणारे संयंत्र ज्यामध्ये पीडीकेवी मिनी दाल मिल, सीताफळ गर काढणी यंत्र, मिरची बीज निष्कासन यंत्र, तुती फ्रुटी संयंत्र व अनेक यंत्रे पाहण्यास उपलब्ध आहेत. जातिवंत जनावरांचे प्रदर्शन, ग्राम बीजोत्पादन, सेंद्रिय शेती, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तंत्रज्ञान, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तंत्रज्ञान, फळबाग, फूल शेती, भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, शेती पूरक व्यवसायांचे विविध व उपलब्ध संसाधनांवर आधारित फायदेशीर तंत्रज्ञान, सूक्ष्म सिंचन पद्धती, पाणलोट व्यवस्थापन, औषध व सुगंधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान, रोप वाटिका, फळे व दुग्ध प्रक्रिया उद्योगाचे नानाविध प्रयोग येथे उपलब्ध आहे.

टॅग्स :Agrotech 2017 Akolaअ‍ॅग्रोटेक २0१७ अकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkola cityअकोला शहर