शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'अ‍ॅग्रोेटेक २0१७' कृषी प्रदर्शन : ७५ हजारांवर शेतकर्‍यांनी जाणून घेतले नव कृषी तंत्रज्ञान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:53 IST

अकोला: राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ‘अ‍ॅग्रोेटेक २0१७’च्या पहिल्याच दिवशी शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त  प्रतिसाद होता. पहिल्याच दिवशी कृषी विद्यापीठाच्या नोंदवहीत सायंकाळी ६ वाजतापर्यंत ७५  हजारांवर शेतकर्‍यांची नोंदणी झाली होती. या शेतकर्‍यांनी कृषी विद्यापीठाचे नव तंत्रज्ञान, संशोधन  जाणून घेतले.

ठळक मुद्देराज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ‘अ‍ॅग्रोेटेक २0१७’च्या पहिल्याच दिवशी शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त  प्रतिसाद होता. पहिल्याच दिवशी कृषी विद्यापीठाच्या नोंदवहीत सायंकाळी ६ वाजतापर्यंत ७५  हजारांवर शेतकर्‍यांची नोंदणी झाली होती. या शेतकर्‍यांनी कृषी विद्यापीठाचे नव तंत्रज्ञान, संशोधन  जाणून घेतले.

या कृषी विद्यापीठाने कृषी तंत्रज्ञान, संशोधनात बर्‍यापैकी काम केले असून, हेच विविध प्रकारचे शे ती, तंत्रज्ञान, संशोधन बघण्यासाठी शेतकर्‍यांनी गर्दी केली. कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावरच मोठे  डोम त्यासाठी उभारण्यात आली आहेत. भविष्यात जमिनीशिवाय, अल्प मनुष्यबळात,  कौशल्याधारित शेती शक्य आहे. यांत्रिकीकरणाचा पुरस्कार करीत आता जमिनीच्या मशागतीपासून  तर थेट पक्का माल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात यंत्रांची मदत कशी घेतली जाते, याचे प्रात्यक्षिकच  येथे उपलब्ध आहे. संगणक नियंत्रित सिंचन प्रणाली, फवारण्याचे तंत्र, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा  प्रभावी वापर, उपग्रहाच्या माध्यमातून अचूक हवामान अंदाज, अत्याधुनिक, स्वयंचलित शेती  अवजारे, समूह शेती, गटशेतीची वाढत चाललेली व्याप्ती, नैसर्गिक, सेंद्रिय शेतीप्रती झुकलेला  कल, एकात्मिक पीक तथा अन्नद्रव्य व्यवस्थापन, कृषी विद्यापीठाद्वारे विविध सामाजिक संस्थांच्या  सहयोगाने मोबाइल संदेश, टीव्ही, रेडिओ, इंटरनेटचा वापर करीत प्रयोगशाळेत विकसित झालेले  तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या बांधावर वेळेत कसे पोहोचविले जाणार, याची माहितीही येथे उपलब्ध आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संशोधित कृषी तंत्रज्ञान सर्व घटकांना एकाच जागी बघता  यावे, सोबतच शेती शाश्‍वत आणि शेतकरी समृद्ध करण्यासाठी आपले योगदान देणार्‍या  विविध  शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक, खासगी कंपन्यांची उत्पादने प्रत्यक्ष हाताळता यावे आणि  शंका समाधान करता यावे, या उद्देशाने प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे.  मोबाइल अ‍ॅप करणार शेतकर्‍यांचे प्रबोधन! विस्तार शिक्षण संचालनालयाच्यावतीने शिक्षण, शेतीसंदर्भातील इत्थंभूत माहिती देणारा मोबाइल अ‍ॅप सुरू  करण्यात आला असून, तन व्यवस्थापनाची शास्त्रीय माहिती देण्यासाठी तन व्यवस्थापन  विभागाच्यावतीने मोबाइल अँपची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आली. कृषी विद्यापीठाच्या  कृषी संवादनीचे विमोचनही करण्यात आले.

टॅग्स :Agrotech 2017 Akolaअ‍ॅग्रोटेक २0१७ अकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ