शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

अकाेला : बीटी कपाशी उत्पादन, विपणनासाठी महाबीज साेबत कृषी विद्यापीठाचा करार

By राजेश शेगोकार | Updated: April 19, 2023 18:06 IST

 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून संशोधित नवीन संकरीत कपाशी बीटी वानांमध्ये बीटी बीजी २ जणूकाचा अंतर्भाव करण्याकरिता विद्यापीठ व महाबीज यांच्यामध्ये  सामंजस्य करार झाला आहे.

अकाेला - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून संशोधित नवीन संकरीत कपाशी बीटी वानांमध्ये बीटी बीजी २ जणूकाचा अंतर्भाव करण्याकरिता विद्यापीठ व महाबीज यांच्यामध्ये  सामंजस्य करार झाला आहे.राज्यातील शेतकरी बांधवांची मोठ्या बोंडाच्या कपाशीची वाढती मागणी लक्षात घेऊन कापूस संशोधन केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्याद्वारे संशोधित संकरीत कपाशी वानामध्ये महाबीजमार्फत बीटी जनुकांचा अंतर्भाव करण्यात येईल.

या करारामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना मोठ्या बोंडाचे व अधिक उत्पादनशील संकरित कपाशी वाण लवकरच उपलब्ध होईल असा आशावाद यावेळी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केला. तर जनुकीय परिवर्तित कापूस वाणांच्या उत्पादन आणि विपणनात महाबीज सर्व क्षमतेने सहयोगाची भूमिका स्वीकारेल व यथाशीग्र सुधारित बीटी वाण शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्री यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठाने संशोधित केलेल्या उडीद, भुईमूग, हरभरा आधी पिकांच्या जातींनी देशभरातील बहुतांश एरिया बहुतांश प्रदेशात असून, येणारे बीटीवान सुद्धा निश्चितच लोकप्रिय होईल असा विश्वास सुद्धा व्यक्त केला. व सोयाबीनच्या पीडीकेवी अंबा व सुवर्ण सोया या वाणांचे पैदासकार बियाणे महाबीजला उपलब्ध करून दिल्यास त्यांचे सुद्धा शेतकरी वर्गांना उपलब्ध करून देता येतील अशी ग्वाही त्यांनी दिली.