शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठांच्या परीक्षा १५ जूनला; नियोजन ठरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 10:35 IST

भारतीय कृषी संशोधन परिषदेने ८ मे रोजी कृषी विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याबाबत मार्गदर्शक तत्त्व निर्धारित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यातील कृषी विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ जूनपर्यंत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात आॅनलाइन आणि आॅफलाइन पद्धतीने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेचा समावेश आहे. यासंदर्भात गुरुवारी एका बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.भारतीय कृषी संशोधन परिषदेने ८ मे रोजी कृषी विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याबाबत मार्गदर्शक तत्त्व निर्धारित केले आहे. या पृष्ठभूमीवर कृषी मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील १०१९-२० शैक्षणिक वर्षातील विविध कृषी व संलग्न विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाकरिता राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचा परीक्षा नियोजन आराखडा केला आहे. या विषयावर पुन्हा गुरुवारी बैठक होऊन परीक्षा घेण्याचे ठरले. तशा सूचना सर्व कृषी महाविद्यालयांना देण्यात येत आहेत. बीएससीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा घेण्यासंदर्भात आणि आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या काही विषयांची परीक्षा झाली आहे. यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अगोदरच्या वर्षाचे सरासरी ५० टक्के गुण देऊन २, ४ आणि ६ व्या सेमिस्टर च्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षात प्रवेश देण्यात येणार आहे. या आॅनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहेत. ज्यांना आॅनलाइन संदर्भात अडचणी आहेत, गावात नेट उपलब्ध नाही, असे विद्यार्थी आॅफलाइन परीक्षा देऊ शकतात; पण त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना रीतसर अर्ज करून यासाठीची परवानगी घ्यावी लागणार आहे.कृषी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी गाइड्सची नेमणूक केलेली आहे. ‘आयसीएआर’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार १५ जुलैपर्यंत निकाल देणे आवश्यक आहे. सप्टेंबरमध्ये नवे शैक्षणिक वर्ष सुरू व्हावे, असा यामागील उद्देश आहे.‘आयसीएआर’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार परीक्षेची तयारी करण्यात आली आहे. १५ जूनपर्यंत परीक्षा आणि १५ जुलैपर्यंत निकाल घोषित करायचा आहे. यासंदर्भात गुरुवारी बैठक झाली आहे. यासंदर्भात सर्व कृषी महाविद्यालयांना सूचना देण्यात येत आहेत.- डॉ. प्रदीप इंगोले, संचालक शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ