शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

हरभरा घोटाळ्यात कृषी विभाग गप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 03:24 IST

हरभरा बियाणे घोटाळाप्रकरणी २११ कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचा प्रस्ताव असतानाही तो दडवून ठेवणारे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला.

ठळक मुद्देस्थायी समितीच्या सभेत सदस्य संतप्त : सीसीटी बांधप्रकरणी कारवाई करा!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सिमेंट नाला बांध बुडीत क्षेत्रात टाकणाºया कृषी विभागाच्या अधिकाºयांवर कारवाई करा, हरभरा बियाणे घोटाळाप्रकरणी २११ कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचा प्रस्ताव असतानाही तो दडवून ठेवणारे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला.जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, अर्थ व शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट, सभापती माधुरी गावंडे, देवका पातोंड, रेखा अंभोरे यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यावेळी उपस्थित होते.राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत शासनाने शेतकºयांना अनुदानित दरावर हरभरा बियाणे उपलब्ध केले. ते बियाणे पात्र शेतकºयांना न मिळता काही कृषी सेवा केंद्र संचालकांनी बनावट नावाच्या शेतकºयांना वाटप केल्याचे दाखविले. प्रत्यक्षात ते बियाणे धान्य रूपात काळ्याबाजारात विकण्यात आले. त्यातून शासनाच्या लाखो रुपयांच्या अनुदानाला चुना लावण्यासोबतच काळ्याबाजारातील अधिक दराचा मलिदा कृषी केंद्र संचालकांनी लाटला.विभागीय कृषी सहसंचालकांच्या पथकाने केलेल्या चौकशीत २११ कृषी केंद्रांत हा घोटाळा कमी-अधिक प्रमाणात झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार कृषी केंद्रांवर पुढील कारवाई करण्याचे पत्र अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने ५ जुलै रोजीच जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी एच.जी. ममदे यांना पाठविले. त्या पत्रानुसार २० दिवसांनंतरही कुठलीच कारवाई का झाली नाही, असा सवाल सदस्य शोभा शेळके यांनी उपस्थित केला.त्यावर सभागृहात उपस्थित मोहीम अधिकारी अरुण गावंडे यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विजयकुमार लव्हाळे यांच्यासह सदस्यांनी मुद्दा लावून धरत कारवाईची मागणी केली. त्यानुसार कारवाई करण्याचा ठराव घेण्यात आला.निकृष्ट बंधारे, बुडीत बांधांची रक्कम वसूल करा!जिल्हा परिषदेच्या कोल्हापुरी बंधाºयानंतर आता जलयुक्त शिवार अभियानातील सिमेंट नाला बांधाच्या कामातही लाखो रुपयांचा निधी अधिकारी वाया घालवत आहेत. शासनाच्या निधीचा अपव्यय करणाºया त्या अधिकारी-कर्मचाºयांकडून निधी वसुलीची मागणी सदस्य गोपाल कोल्हे यांनी केली. पातूर तालुक्यात बºयापैकी पाऊस होत असताना ते पाणी अडविण्यासाठी एकही बंधारा सुस्थितीत नाही. याप्रकरणीही कोणीच गंभीर नसल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. सदस्यांच्या मुद्यांवर काहीच होत नसल्यास यापुढे खास पद्धतीनेच अधिकाºयांचा समाचार घ्यावा लागेल, असा इशाराही कोल्हे यांनी दिला.विभागप्रमुखअनुपालनच देत नाहीत!जिल्हा परिषदेच्या कोणत्याही सभेत सदस्यांकडून मुद्दे उपस्थित केले जातात. त्याचे कोणतेच गांभीर्य विभाग प्रमुख ठेवत नाहीत. त्यावर काय कारवाई केली, याची माहितीही पुढील सभेत ठेवत नाहीत. ही बाब लव्हाळे यांनी मांडली. पुढील सभेत अनुपालन अहवाल ठेवण्याचे आदेश अध्यक्ष वाघोडे यांनी दिले.बाळापुरातून कृषीच्या तीन पंपांची चोरीकृषी विभागाकडून बाळापूर तालुक्यातील शेतकºयांना वाटप करावयाच्या तीन पंपांची चोरी झाली. त्या शेतकºयांना लाभार्थी हिस्सा परत करून त्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आले. या प्रकाराला जबाबदार असलेल्यांची चौकशी करून कारवाईची मागणी सभेत करण्यात आली. वाडेगावातील घरकुलाची कामे अर्धवट असून, त्यामध्ये शौचालयांचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे शाखा अभियंत्याला कारणे दाखवा नोटिस बजावण्यात येत असल्याचे डॉ. हिंमत घाटोळ यांच्या मुद्यावर सांगण्यात आले.न्यायालयातून मुक्त शिक्षकाला रुजू करा!पत्नीच्या हत्येच्या आरोपात पाच वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर न्यायालयाने दोषमुक्त केलेल्या शिक्षक मसूद अली यांना रुजू करून घेण्याचा ठराव मांडण्यात आला. सोबतच ही माहिती दडवून ठेवणारे अकोट पंचायत समितीचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी, कर्मचाºयांना कारणे दाखवा बजावण्याचेही यावेळी ठरले.विशेष घटक योजनेचे अनुदान थांबवा!विशेष घटक योजनेतून अकोट पंचायत समितीमध्ये मुदतीनंतर तिफन पुरवठा केला जात आहे. हा प्रकार नियमबाह्य असून, आधीच देयक अदा केल्यानंतर चार ते पाच महिन्यांनी पुरवठा होत आहे. या प्रकाराला संबंधित अधिकारी जबाबदार असून, योजनेचे अनुदान थांबविण्याची मागणी सभापती अरबट यांनी केली. पशुवैद्यकीय दवाखान्यांना औषध पुरवठा करण्यासाठी ४३ लाख रुपयांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली.-