शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रांनी अनुदानित बियाणे वाटप याद्या दडवल्या!

By admin | Updated: November 8, 2016 02:19 IST

कृषी विभागाचे बोटचेपे धोरण; महाबीज वितरकांकडूनही दिरंगाई.

अकोला, दि. ७- महाबीजने रब्बीसाठी दिलेल्या अनुदानित हरभरा बियाणे वाटपातून कृषी सेवा केंद्र संचालकांनीच उखळ पांढरे केल्याने त्यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला लाभार्थी शेतकर्‍यांच्या सात-बारासह याद्याच दिलेल्या नाहीत. सोमवारपर्यंतही त्या याद्या कृषी विभागाकडे उपलब्ध नव्हत्या, हे विशेष. गरजू शेतकर्‍यांवर अन्याय करण्यासोबतच अनुदानाची रक्कम घशात घालणार्‍या कृषी सेवा केंद्र संचालकांबाबत कृषी विभागाचे असलेले बोटचेपे धोरणही त्या अन्यायाला मूक संमती असल्यासारखेच दिसत आहे. महाबीजने २४ सप्टेंबर २0१६ या दिवसांपासून अनुदानित बियाणे वितरकांना दिले. बियाणे बॅगवर कोणताही शिक्का नव्हता. त्यामुळे काही कृषी सेवा केंद्रांनी सुरुवातीचे बियाणे थेट खुल्या बाजारात विक्री केले. अनुदानाची रक्कम आणि बाजारातील अतिरिक्त किमतीचा मलिदा कृषी सेवा केंद्र संचालकांनी लाटला. गरजू शेतकर्‍यांना बियाणे मिळत नसल्याची ओरड झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला. तोपर्यंत मोठय़ा प्रमाणात बियाण्यांचा काळाबाजार झाला. ह्यलोकमतह्णने त्याबाबत वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रात धाव घेऊन शेतकर्‍यांना रांगेत बियाणे वाटप सुरू केले; मात्र पूर्वी वाटप झालेल्या लाभार्थी शेतकर्‍यांची यादी, सात-बारा गोळा करण्यास हयगय केली. त्यामुळे आठवडाभरानंतरही लाभार्थी शेतकर्‍यांची यादी महाबीज किंवा कृषी विभागाकडे उपलब्ध नाही. त्या शेतकर्‍यांची पडताळणी करणेही कृषी विभागाला जमलेले नाही. त्यातूनच कृषी सेवा केंद्र संचालकांनी केलेला घोळ उघड होणार आहे; मात्र त्याकडेच कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.