शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाची संशोधन वाचविण्यासाठी धडपड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:59 IST

अकोला : यावर्षी पाऊसच पूरक झाला नाही. शरद सरोवर विमानतळ विस्तारीकरणात गेले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे आता कायमस्वरू पी पाण्याचा स्रोतही उपलब्ध नसल्याने संशोधन जगविण्यासाठी शास्त्रज्ञांना आतापासूनच धडपड करावी लागत आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक संशोधनाचे प्लॉट येथून हलवावे लागणार आहेत.

ठळक मुद्देपाण्याचा एकही कायमस्वरू पी स्रोत नाहीसंशोधन हलवावे लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षी पाऊसच पूरक झाला नाही. शरद सरोवर विमानतळ विस्तारीकरणात गेले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे आता कायमस्वरू पी पाण्याचा स्रोतही उपलब्ध नसल्याने संशोधन जगविण्यासाठी शास्त्रज्ञांना आतापासूनच धडपड करावी लागत आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक संशोधनाचे प्लॉट येथून हलवावे लागणार आहेत.   कृषी विद्यापीठाकडे जवळपास पाच हजार एकराच्यावर शेतजमीन आहे. यात मुख्य बीजोत्पादन क्षेत्र वणी रंभापूर, मध्यवर्ती संशोधन केंद्रांतर्गत सर्वाधिक शेतजमीन आहे. या दोन्ही प्रक्षेत्रावर विविध संशोधन कंेद्र आहेत. रब्बी पिकांची तयारी सध्या सुरू  करण्यात आली; पण पाणीच उपलब्ध नसल्याने या संशोधन केंद्रांतर्गत संशोधनाचे काम करणार्‍या शास्त्रज्ञांपुढे आव्हान आहे. कमी खर्चाचे तंत्रज्ञान, कृषी निविष्ठा अर्थात बी-बियाणे संशोधन करू न शेतकर्‍यांना उपलब्ध करू न देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्याकरिता शास्त्रज्ञांच्या वेतनावर शासन मोठा खर्च करीत आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद, केंद्र व राज्य शासन संशोधनाकरिता निधी उपलब्ध करू न देते. तथापि, यावर्षी पाऊस नाही आणि पाण्याचा कायमस्वरू पी स्रोत उपलब्ध नसल्याने हिवाळय़ातच रब्बी पिकांच्या पेरणीचा प्रश्न उपस्थित झाला. आताच ही परिस्थिती आहे, तर उन्हाळ्यात शास्त्रज्ञांना हातावर हात धरू न बसण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. अकोल्याच्या कृषी विद्यापीठावर मागासलेल्या विदर्भाची मोठी जबाबदारी आहे. या कृषी विद्यापीठाने अनेक वाण विकसित करू न शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे; पण अलीकडच्या पाच-सात वर्षांत पावसाची अनिश्‍चितता बघता संशोधन, बीजोत्पादनावर परिणाम होत आहेत. रब्बी हंगामातील पिकांचे बीजोत्पादन घेतले जाते; परंतु पाणी नसल्याने बीजोत्पादनावरही परिणाम होत आहे. यावर्षीची परिस्थिती तर खूपच वेगळी आहे. पाणीच नसल्याने रब्बीचे उत्पादन घेणार कसे, यासाठीची कसरत सध्या विद्यापीठात सुरू  आहे. 

कृषी विद्यापीठात कायमस्वरू पी पाण्याचा स्रोत नाही, हे खरे आहे. शरद सरोवरही विमानतळ विस्तारीकरणात गेला आहे. त्यामुळे सध्या जेथे ओलावा आहे, तेथे रब्बीचे बीजोत्पादन घेतले जाईल. कूपनलिकांना जेथे पाणी उपलब्ध आहे, त्याचा वापर करण्यात येईल. उन्हाळ्यात मात्र परिस्थिती गंभीर होईल. त्यासाठी विदर्भात जेथे पाणी उपलब्ध आहे, तेथे येथील संशोधन हलविले जाणार आहे. लवकरच कायमस्वरू पी पाण्याचा स्रोत मिळण्यासाठी प्रयत्न शासनाकडे करणार आहे.डॉ. व्ही. एम. भाले,कुलगुरू ,डॉ. पं.दे.कृ. वि., अकोला.-

टॅग्स :universityविद्यापीठ