शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 14:45 IST

अकोला : आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर शेतीचे नवतंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने निर्णय घेतला असून, सोयाबीन व कपाशी या पिकावर गंधक व खताचा वापर करू न आदिवासी शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे रासायनिक खत व्यवस्थापन प्रकल्पामार्फत आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे. याची सुरुवात अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील गोटा, माखला व दुनी या अतिदुर्गम गावातील आदिवासी शेतकºयांच्या शेतावर तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे.

अकोला : आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर शेतीचे नवतंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने निर्णय घेतला असून, सोयाबीन व कपाशी या पिकावर गंधक व खताचा वापर करू न आदिवासी शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.या कृषी विद्यापीठाने या अगोदरही आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी विद्यापीठाने तंत्रज्ञान पोहोचवले आहे. यावर्षी या कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागातील अखिल भारतीय समन्वयित सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये व्यवस्थापन प्रकल्प व अखिल भारतीय दीर्घ मुदतीय रासायनिक खत व्यवस्थापन प्रकल्पामार्फत आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे. याची सुरुवात अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील गोटा, माखला व दुनी या अतिदुर्गम गावातील आदिवासी शेतकºयांच्या शेतावर तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे.गंधक या घटकाचा वापर करू न सोयाबीन व कपाशी या पिकाच्या उत्पादन वाढीची शिफारस विद्यापीठामार्फत करण्यात आली आहे. यानुषंगाने प्रामुख्याने सोयाबीन व कपाशी या पिकावर गंधक व खताचा वापर करू न आदिवासी शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.या प्रकल्पाद्वारे निवडक शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी निविष्ठा प्रामुख्याने बियाणे व खते पुरविण्यात येणार आहेत. यावर्षी खरीप हंगामातील पेरणीपासून ते कापणीपर्यंत कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शेतकºयांच्या शेतातील मातीचे नमुने गोळा करण्यात आले असून, त्यांना जमिनीतील मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये इत्यादी मिळून एकूण १७ घटकांची तपासणी करू न जमिनीची आरोग्य पत्रिका विनामूल्य देण्यात येणार आहे. तसेच शेतकºयांना विविध प्रकारच्या शेती व तंत्रज्ञानासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

- शाश्वत शेती उत्पादनासाठी कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकºयांना प्रशिक्षण व मार्गदर्शनदेखील करण्यात येणार आहे.- डॉ. विलास भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ