शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठांना बीजोत्पादनाचे अतिरिक्त उद्दिष्ट!

By admin | Updated: November 23, 2015 02:16 IST

मनुष्यबळ, संसाधनाचा अभाव, मुख्यमंत्री घेणार आज आढावा.

राजरत्न सिरसाट/अकोला : राज्यातील कृषी विद्यापीठांनी बीजोत्पादनात गती वाढवावी व जैविक खताच्या निर्मितीवर सक्षमतेने भर देण्यासाठी शासनाने कृषी विद्यापीठांना तीनपट उद्दिष्ट वाढविण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात सोमवारी मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. दरम्यान, कृषी विद्यापीठांकडे असलेले अपुरे मनुष्यबळ व संसाधनाचा अभाव, या उद्दिष्टाला अडसर ठरत असल्याने कृषी विद्यापीठांसमोर पेच निर्माण झाला आहे. राज्यात अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख, राहुरीचे (अहमदनगर) महात्मा जोतिबा फुले, परभणी येथील स्व. वसंतराव नाईक मराठवाडा आणि दापोली (रत्नागिरी) येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे. पण, या चार कृषी विद्यापीठात प्रचंड मनुष्यबळाचा अभाव असून, एकट्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दोन हजाराच्यावर पदे रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक कृषी शास्त्रज्ञ पदांचा समावेश आहे. शासनाने नवे कृषी महाविद्यालय सुरू केल्याने सध्या कार्यरत पदे या महाविद्यालयाकडे वळविण्यात आले आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पदे रिक्त असल्याने कृषी विद्यापीठांना या सर्व बाबींना न्याय देताना कसरत करावी लागत आहे. असे असताना बीजोत्पादनाचे नवे उद्दिष्ट आल्याने कृषी विद्यापीठासमोर पेच निर्माण झाला आहे. बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी कृषी विद्यापीठाचे स्वतंत्र प्रक्षेत्र संचालक व दीडशे कर्मचारी वर्ग असायचा. तथापि प्रक्षेत्र संचालकाचे पद रद्द करण्यात आले असून, कर्मचारी नाहीत. यासोबतच पाणी आणि बीजोत्पादनासाठी लागणारे साधनेही नसल्याने, आहे तेच बीजोत्पादन करणे कृषी विद्यापीठाला जड झाले असताना शासनाने बीजोत्पादनाचे उद्दिष्ट तीनपट वाढवून कृषी विद्यापीठाची परीक्षा घेण्याचे ठरवले असल्याने एकूणच कृषी विद्यापीठांच्या वर्तुळात चर्चेचा विषय आहे. कृषी विद्यापीठाने निर्माण केलेले ब्रिडर व पायाभूत बियाणे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) माध्यमातून शेतकर्‍यांना बिनदिक्कत उपलब्ध व्हावीत, हा शासनाचा उद्देश आहे. पण, ही अपेक्षा ठेवताना शासनाने यासाठी लागणार्‍या बाबींवर लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली जात आहे. बीजोत्पादनांचे लक्ष्यांक आणि जैविक खताच्या निर्मितीवर कृषी विद्यापीठांनी लक्ष द्यावे, याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: सोमवारी आढावा घेणार असल्याचे परभणी येथील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.बी. वेंकटस्वरलू यांनी स्पष्ट केले.

**पदांचा अभाव

      चारही कृषी विद्यापीठांमध्ये जवळपास पाच ते सहा हजार पदे रिक्त आहेत. अकोला येथील डॉ. पं. दे. कृषी विद्यापीठात १८00 च्यावर पदे रिक्त असून, यात सातशेच्यावर कृषी शास्त्रज्ञांच्या रिक्त पदांचा समावेश आहे.