शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

कृषी विद्यापीठात शहिदांना सलाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:42 IST

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी संघर्ष करताना हौतात्म्य आलेल्या शहिदांना रविवारी आदरांजली वाहण्यात आली, तसेच माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देस्व. राजीव गांधी जयंतीनिमीत्त सद्भावना दिवस साजरा!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी संघर्ष करताना हौतात्म्य आलेल्या शहिदांना रविवारी आदरांजली वाहण्यात आली, तसेच माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना विदर्भातच व्हावी, याकरिता  आंदोलन १९६८ साली उभारण्यात आले होते आणि या आंदोलनातील सहभागी आंदोलकांनी २0 ऑगस्ट रोजी अमरावती येथे उग्र निदर्शने केली होती. विद्यापीठ आंदोलकांना रोखण्यासाठी झालेल्या गोळीबारात नरेंद्र देशमुख, सुरेश भडके, भिरुमल रिझुमल, सुरेश कुर्‍हे, प्रफुल्लचंद्र कोठारी, गजानन देवघरे, नेमीचंद गोपाल, सुरेश वानखडे, शेख रफिक शहीद झाले, तर असंख्य विदर्भवीर जखमी झाले. या शहिदांचे बलिदान मात्र व्यर्थ गेले नाही. कारण विदर्भाच्या शेती क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना अकोला येथे २0 ऑक्टोबर १९६९ रोजी झाली. विद्यापीठ स्थापनेसाठी बलिदान देणार्‍या शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी विद्यापीठ मुख्यालयी शहीद स्मारक येथे विशेष सभेचे आयोजन २0 ऑगस्ट रोजी करण्यात येते. रविवारी संपन्न झालेल्या आदरांजली सभेसाठी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे, तर विशेष अतिथी म्हणून या आंदोलनाचे साक्षीदार व स्वत: जखमी झालेले अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील रवींद्र कन्हैयालाल कानुगो यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रमुख अतिथींनी शहिदांच्या प्रतिमांना पुष्पचक्र अर्पण करीत आदरांजली वाहिली. याप्रसंगी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र नागदेवे यांनी उपस्थितांना सद्भावना शपथ दिली. याप्रसंगी विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता डॉ. दामोदर तामगाडगे, डॉ. विलास खर्चे, डॉ. प्रकाश नागरे, डॉ. ययाती तायडे, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, सहायक कुलसचिव डॉ. श्रीकांत आहेरकर, कुलगुरू कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ.शशांक भराड, विद्यापीठ अभियंता रामदास खोडकुंभे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, मजूर, विद्यार्थी तथा विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन तथा सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याण अधिकारी संजय कोकाटे यांनी केले. त्यांना राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यापीठ सुरक्षा विभाग यांच्यासह सामान्य प्रशासन विभाग, विद्यार्थी कल्याण विभाग आदींनी सहकार्य केले. पोलीस प्रशासनाच्या कर्मचार्‍यांनी बिगुल वाजवून श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी गुलाबपुष्प अर्पण करीत शहिदांना वंदन केले.