शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कृषी महाविद्यालयांना सादर करावे लागणार प्रगती पुस्तक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 14:57 IST

दरवर्षी तीन दिवस हा आढावा घेण्यात येणार असून, कृषी महाविद्यालयातील प्रयोगशाळा, जागा, मैदानाची अवस्था तर तपासण्यात येईल.

- राजरत्न सिरसाट

अकोला : कृषी शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा आढावा दरवर्षी घेतला जातो. आता कृषी शिक्षणाचा आढावा घेतला जाणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यासाठीचे पाऊल उचलले आहे. येत्या शैक्षणिक वर्षात विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालयांना प्रगती पुस्तक सादर करावे लागणार आहे. देशातील अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रयोग मानला जात आहे.कृषी विद्यापीठांतर्गत विदर्भात शासकीय व खासगी मिळून विदर्भात ३६ कृषी महाविद्यालये आहेत. जैवतंत्रज्ञान या विषयासाठी पहिले शासकीय पदवी महाविद्यालय विदर्भाला मिळालेले आहे. उद्यानविद्या, वनविद्या, कृषी, अन्नशास्त्र, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी अभियांत्रिकी,जैवतंत्रज्ञान या सर्व शाखांमध्ये पदवी ते आचार्यपर्यंत पदवी अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहे. दोन हजार पाचशेच्यावर विद्यार्थी दरवर्षी येथून विविध विषयांची पदवी ग्रहण करतात. वैद्यकीय, अभियांत्रिकीनंतर विद्यार्थीं कृषी अभ्यासक्रमाला पसंती देत असल्याने कृषी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.सीईटी,नीटप्रमाणे आता कृषी पदवी,पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीही सीईटी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात येत आहे. म्हणूनच कृषी शिक्षणाचा दर्जा आणखी सुधारावा, असे प्रयत्न कृषी विद्यापीठाचे आहेत. दरवर्षी तीन दिवस हा आढावा घेण्यात येणार असून, कृषी महाविद्यालयातील प्रयोगशाळा, जागा, मैदानाची अवस्था तर तपासण्यात येईलच; गुणवत्ता यादी, किती विद्यार्थी भारतीय कृषी संशोधन परिषदेला नियुक्त झाले,किती विद्यार्थ्यांना फेलोशीप मिळाली, नोकरीला किती लागले, सद्यस्थिती काय आहे. याचे सादरीकरण महाविद्यालयाच्या प्राचार्यांना करावे लागणार आहे.राज्यात चार कृषी विद्यापीठे असून, चारही कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ दरवर्षी महत्त्वाचे बियाणे व इतर संशोधन तसेच शेतीपयोगी तंत्रज्ञान विकसित करीत असतात. यामध्ये यंत्राचासुद्धा समावेश असतो. यात काही संशोधन अनेक वर्षांनंतर यशस्वी होते. आपल्या नावावर संशोधन असावे म्हणून त्यासाठी शास्त्रज्ञ परिश्रम घेतात. विकसित केलेले हे संशोधन राज्यस्तरीय संशोधन समितीपुढे (ज्वॉइंट अ‍ॅग्रोस्को) मान्यतेसाठी मांडले. तत्पूर्वी कृषी विद्यापीठ स्तरावर संशोधनाचा आढावा घेतला जातो. नंतरच ते ज्वॉइंट अ‍ॅग्रोस्कोमध्ये पाठवले जाते. त्यासाठी शास्त्रज्ञांना त्यांनी केलेल्या संशोधनाचे सादरीकरण करावे लागते. याच धरतीवर विदर्भातील कृषी महाविद्यालयाचा आढावा घेतला जाणार आहे.

कृषी शिक्षणाला दर्जा आहे. यात आणखी सुधारणा व्हावी, स्पर्धा वाढून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा,यादृष्टीने दरवर्षी तीन दिवस कृषी महाविद्यालयाचा आढावा घेतला जाणार आहे.- डॉ. विलास भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ