शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 16:02 IST

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी रेटून धरण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी/कर्मचारी महासंघाने राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे. या अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील एनएचएम कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.आरोग्य ...

ठळक मुद्देएनएचएम कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात केली. आंदोलनात एनएचएम अंतर्गत कार्यरत असलेले जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले.मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले.

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी रेटून धरण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी/कर्मचारी महासंघाने राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे. या अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील एनएचएम कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने तुटपुंजा मानधनावर कार्यरत असलेले ‘एनएचएम’ कर्मचारी आरोग्यसेवेत कायम करून घेण्याच्या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. समान काम-समान वेतन व कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी हे कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांना सेवेत सामावून घेण्याची शक्यता पडताळण्यासाठी आरोग्य विभागाने अभ्यास समिती गठित केली असतानाच, आयुक्त, आरोग्यसेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या कार्यालयाकडून २ एप्रिल रोजी राज्यभरातील जिल्हा कार्यालयांना कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मूल्यांकन अहवालाची एक्सलशिट पाठविण्यात आली आहे. यामध्ये कामाच्या स्वरूपानुसार गुणांकन पद्धती असून, त्यावर आधारित मूल्यांकन अहवाल तयार होणार आहे. मूल्यांकन अहवालानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ, नोकरीवर कायम ठेवणे किंवा कमी करणे, या बाबी निश्चित करण्यात येणार आहेत. कंत्राटी कर्मचाºयांना यापुढे सहा महिन्यांची पुनर्नियुक्ती देण्याच्या सूचनाही अतिरिक्त संचालकांनी दिल्या आहेत. आरोग्य विभागाच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात एनएचएम अंतर्गत कार्यरत असलेले जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले.या आहेत मागण्या.....एनएचएम कर्मचाऱ्यांचे समकक्ष पदावर विनाशर्त समायोजन.समायोजन होईपर्यंत समान काम-समान वेतन देण्यात यावे.अभ्यास समितीचा सकारात्मक अहवाल शासनास पाठविण्यात यावा.सद्यस्थितीत कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी कोणालाही काढण्यात येऊ नये.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय