शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

पदवी ग्रहणानंतर विद्यार्थ्यांनी केला कृषी विद्यापीठात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:53 IST

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. अनेक विद्यार्थी  विद्यापीठ सोडणार असल्याने सेल्फी काढून हे क्षण स्मरणात ठेवले. दरम्यान, बीएससी पदवी ग्रहण केल्यांनतर दीक्षांत सभागृहातही विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.

ठळक मुद्दे दीक्षांत समारंभ आठवणी जपून ठेवण्यासाठी धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. अनेक विद्यार्थी  विद्यापीठ सोडणार असल्याने सेल्फी काढून हे क्षण स्मरणात ठेवले. दरम्यान, बीएससी पदवी ग्रहण केल्यांनतर दीक्षांत सभागृहातही विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.  दीक्षांत समारंभात जाण्यासाठी शिस्तबद्ध ओळीने पाहुण्यांसह विद्यार्थी पोहोचले. सकाळी १0 वाजता समारंभाला सुरुवात झाली. सुरुवातीला विदर्भाच्या गुणगौरवाचे गीत सादर करण्यात आले. त्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. विलास भाले यांनी पहिल्या दीक्षांत समारंभात प्रास्ताविक केले. त्यांनी कृषी विद्यापीठाच्या संशोधन, शिक्षण, विस्ताराचा लेखाजोखा प्रास्ताविकातून माडंला. विद्यार्थ्यांची पदवी ग्रहणाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कुलगुरूं च्या प्रास्ताविकानंतर लगेच पदवीदान समारंभाला सुरुवात झाली. सुरुवातीला पीएच.डी.च्या ४१ जणांना नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. त्यानंतर राज्याचे कृषिमंत्री तथा कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती पांडुरंग फुंडकर यांनी बीएससी, एमएससीच्या विद्यार्थ्यांना सामूहिक पदवी प्रदान केली. पदवी ग्रहण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर नाबार्डचे माजी अध्यक्ष उमेशचंद्र सारंगी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तेव्हा विद्यार्थ्यांचे लक्ष दीक्षांत भाषणाकडे लागले होते. सारंगी यांच्या मार्गदर्शनानंतर डॉ. भटकर यांनी दीक्षांत भाषण केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपल्या जन्मभूमीचे दर्शन घ्या, गावाच्या विकासासाठीचे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांनी त्याचे एक ते सव्वा तासाचे भाषण अध्र्या तासाच्या आत संपवले. विद्यापीठात सात ते आठ वर्ष शिक्षण घेतल्यानंतर परस्परांना सोडताना यावेळी विद्यार्थी भावूक झाल्याचे चित्र येथे होते. अनेक विद्यार्थ्यांनी सामूहिक छायाचित्र, सेल्फी काढली. 

विद्यार्थ्यांंना दीक्षांत पोषाखकृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पोषाखाला महत्त्व आहे. पीएच.डी. ग्रहण करणार्‍या विद्यार्थ्यांना ‘मरूण’ रंगाचा पोषाख होता, तर एमएसीच्या विद्यार्थ्यांंना हिरव्या रंगाचा पोषाख होता, बीएससीच्या विद्यार्थ्यांंना केशरी रंगाचा पोषाख होता. विद्यार्थ्यांंनी दीक्षांत सभागृह गच्च भरले होते. समारंभाच्या शेवटी पसायदान व पोलीस पथकाच्या बॅण्डचे आकर्षण होते. राष्ट्रगीताने समारंभाची सांगता झाली.

माजी कुलगुरूं ची भेटया समारंभाला माजी कुलगुरूं ची उपस्थिती होती. कुलगुरू  पदाच्या रिक्त जागेवर डॉ.व्ही.टी. रहाटे यांचा ९0 च्या दशकात कुलगुरू  म्हणून एक वर्षाचा कार्यकाळ होता. ते आता ९0 वर्षांंचे झाले, पण या दीक्षांत समारंभाला ते उपस्थित होते.

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkola cityअकोला शहर