शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू बाळही दगावले, लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच गेली ‘लक्ष्मी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 05:05 IST

प्रसुतीसाठी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात (लेडी हार्डिंग) दाखल झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील झाडेगाव येथील महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची घटना ऐन दिवाळीच्या दिवशी १९ आॅक्टोबर रोजी घडली.

अकोला : प्रसुतीसाठी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात (लेडी हार्डिंग) दाखल झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील झाडेगाव येथील महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची घटना ऐन दिवाळीच्या दिवशी १९ आॅक्टोबर रोजी घडली. नवजात मुलीचाही विशेष नवजात शिशू दक्षता कक्ष (एसएनसीयू)मध्ये शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी अकोट फैल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव-माणेगाव येथील विवाहिता सोनू भीमराव आगरकर (२३) यांना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुरुवार, १९ आॅक्टोबर रोजी प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी सकाळी ११ वाजताच्या सुमारास प्रसूतीसाठी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात आणले. येथे दाखल झाल्यानंतर रात्री ९.२० वाजताच्या दरम्यान सोनू आगरकर यांनी एका मुलीला जन्म दिला. रुग्णालयातील एका परिसेविकेच्या निगराणीखाली सामान्य प्रसुती झाली. त्यानंतर मात्र सोनू आगरकर यांची प्रकृती बिघडली. रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी अत्यवस्थ झालेल्या सोनू वाघमारे यांना सर्वोपचार रुग्णालयाकडे ‘रेफर’ केले; परंतु तेथे त्यांचा मृत्यू झाला.कमी दिवसाच्या असलेल्या बाळाला जिल्हा स्त्री रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये ठेवण्यात आले; परंतु शुक्रवारी सकाळी सोनू आगरकर यांच्या नवजात मुलीचाही मृत्यू झाला. दरम्यान, गुरुवारी दिवाळीची सुटी असल्यामुळे रात्रीच्या वेळी रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी नसल्यामुळे एकट्या परिसेविकेला सोनू यांची प्र्रसूती करावी लागली. यावेळी डॉक्टर हजर असते, तर हा प्रकार घडला नसता, असा आरोप करीत सोनू आगरकर यांच्या नातेवाइकांनी अकोट फैल पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, सोनू आगरकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला.-सोनू आगरकर यांना प्रसूतीसाठी येथे आणले, तेव्हा त्यांच्यात रक्ताल्पता होती व त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण ६.१ एम.जी. एवढे होते. त्यामुळे त्यांना येथे दोन वेळा रक्त चढविण्यात आले. प्रसूती ‘नॉर्मल’ झाल्यानंतर अर्ध्या-पाऊण तासाने सोनू यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे आम्ही त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात ‘रेफर’ केले; परंतु तेथे त्यांचा मृत्यू झाला. ‘एसएनसीयू’मध्ये दाखल असलेल्या त्यांच्या नवजात मुलीचाही ‘प्रिमॅच्युअरिटी’ व ‘आरडीएस’मुळे मृत्यू झाला.- डॉ. तरंगतुषार वारे, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला. 

टॅग्स :Deathमृत्यू