शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ‘कंझ्यूमर प्रोटेक्शन’ संघटनेच्या उपोषणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 16:16 IST

अकोला : प्रशासन लवकरच गुटखा मुक्त अकोलासाठी सर्वसमावेशक पथक गठीत करून अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांना कायमचा प्रतिबंध घालणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी दिल्यानंतर ‘कंझ्यूमर प्रोटेक्शन’ संघटनेच्या सदस्यांनी मंगळवारपासून सुरु केलेल्या त्यांच्या बेमुदत उपोषणाची सांगता शुक्रवारी सायंकाळी केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० एप्रिल पासून संजय पाठक यांनी आमरण उपोषण सुरु केले होते.डॉ. धनंजय नालट, डॉ. दिवाकर तायडे, सुनीता धुरंदर, टीना देशमुख, आस्मा देशमुख, संगीता नानोटे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साखळी उपोषण आरंभिले होते. अनेक सामाजिक व राजकीय पक्षांनी या उपोषणास पाठिंबा जाहीर करून या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले होते.

अकोला : प्रशासन लवकरच गुटखा मुक्त अकोलासाठी सर्वसमावेशक पथक गठीत करून अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांना कायमचा प्रतिबंध घालणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी दिल्यानंतर ‘कंझ्यूमर प्रोटेक्शन’ संघटनेच्या सदस्यांनी मंगळवारपासून सुरु केलेल्या त्यांच्या बेमुदत उपोषणाची सांगता शुक्रवारी सायंकाळी केली. यावेळी अन्न व औषधी विभागाचे सहायक आयुक्त राठोड व महसूल अधिकारी उपस्थित होते.अकोला शहरात शासनाचा बंदीचा आदेश पायदळी तुडवून गुटखा विक्री चौफेर होत आहे. गुटखा विक्री करणाऱ्यां विरुद्ध कठोर कार्यवाही करून अकोला जिल्हा गुटका मुक्त करावा या मागणीसाठी नॅशनॅलिस्ट कंझ्यूमर प्रोटेक्शन आॅर्गनायझेशन च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० एप्रिल पासून संजय पाठक यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. पाठक यांच्यासह डॉ. धनंजय नालट, डॉ. दिवाकर तायडे, सुनीता धुरंदर, टीना देशमुख, आस्मा देशमुख, संगीता नानोटे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साखळी उपोषण आरंभिले होते. दरम्यान, यवतमाळ, अमरावती, वाशीम समवेत जिल्ह्यातील अनेक सामाजिक व राजकीय पक्षांनी या उपोषणास पाठिंबा जाहीर करून या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले होते. पालकमंत्री डॉ.पाटील यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा कचेऱ्यांवर पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी दिला.यावेळी कार्य संघटन सचिव कैलास सचिव, सचिव रितेश पेटकर, विदर्भ संपर्क प्रमुख शंकर कंकाळ, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर विसपुते, रामराव उपर्वट, जावेद देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा विद्या जवके,संतोष हिरोळकर, श्रीकांत आमले,  दिनेश रत्नपारखी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयguardian ministerपालक मंत्री