शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मोर्णा पात्रातील जलकुंभी काढण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 13:08 IST

अकोला: स्थानिक मोर्णा नदी पात्रातील जलकुंभी काढण्यास अखेर महापालिका प्रशासनाने सुरुवात केली असून, काही भागातील जलकुंभी काढल्या गेल्याचे चित्र दिसत आहे.

अकोला: स्थानिक मोर्णा नदी पात्रातील जलकुंभी काढण्यास अखेर महापालिका प्रशासनाने सुरुवात केली असून, काही भागातील जलकुंभी काढल्या गेल्याचे चित्र दिसत आहे. पात्रातील जलकुंभी पूर्णपणे काढल्या गेल्यास अकोलेकरांना डासांच्या त्रासातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. जेसीबी आणि मजुरांची चमू लावून महापालिकेने जलकुंभी काढण्यास सुरुवात केली आहे.मागील उन्हाळ्यात अकोल्यातील जलकुंभी काढण्यासाठी मनपा आयुक्तांनी उशीर केला होता. दरम्यान, अकोल्याचे तत्कालीन वादग्रस्त जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी समाजसेवी संस्थांना हाताशी धरून जलकुंभी काढण्यास सुरुवात केली. अकोल्यातील सामाजिक संस्थांच्या सामूहिक प्रयत्नामुळे मोर्णा स्वच्छ तर झाली; मात्र पाण्डेय वादात सापडले. त्यानंतर पुन्हा यंदा जलकुंभीने डोके वर काढले. गावंडे यांच्या आश्रमापासून तर गडंकीपर्यंतच्या शहराला विभागणाऱ्या मोर्णा नदीच्या पात्रात जलकुंभी विस्तारली गेली आहे. मोठ्या प्रमाणात जलकुंभी पसरल्याने शहारातील प्रत्येक भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नदीकाठी राहणारे आणि इतर नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे. मनपा आयुक्तांकडे यासंदर्भात अनेक तक्रारी सातत्याने गेल्यानंतर कुठे जलकुंभी काढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या १० एप्रिलपासून जलकुंभी काढली जात असून, टप्प्या-टप्प्याने काम सुरू आहे. मजूर आणि जेसीबीच्या साहाय्याने ही जलकुंभी काढल्या जात आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाMorna Riverमोरणा नदीMorna Swachata Missionमोरणा स्वछता मोहीम