शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शिक्षक भरतीचे 'पवित्र' पोर्टल सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 15:06 IST

अकोला: गत काही दिवसांपासून तांत्रिक कारणांमुळे बंद पडलेले शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल सुरू झाले आहे.

अकोला: गत काही दिवसांपासून तांत्रिक कारणांमुळे बंद पडलेले शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल सुरू झाले आहे. या पोर्टलवर २0 जूनपासून इच्छुक उमेदवारांना परीक्षा क्रमांकानुसार जाहिराती दिसणार आहेत, तसेच प्राधान्यक्रम २५ ते ३0 जूनदरम्यान लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.गत काही महिन्यांपासून शिक्षक भरतीबाबत गोंधळ सुरू आहे. भरतीसाठीचे पवित्र पोर्टल तांत्रिक कारणामुळे सातत्याने बंद पडत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपासून बंद असलेले पवित्र पोर्टल गुरुवारपासून सुरू झाले आहे. त्यामुळे आतातरी इच्छुक उमेदवारांना परीक्षा क्रमांकानुसार जाहिराती दिसतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शिक्षण संस्थांमधील १२ हजारांवर जागा भरण्यात येणार आहेत. शिक्षक भरतीमध्ये सध्या पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांच्या पात्रता व विषयांनुसार प्राधान्यक्रम यादी येत आहे; मात्र ही यादी अंतिम करता येत नाही. प्राधान्यक्रम भरण्यास अगोदर २२ मेपासून ३१ मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती; परंतु पवित्र पोर्टल बंद पडले होते. त्यामुळे जाहिराती दिसत नव्हत्या आणि उमेदवारांना प्राधान्यक्रम भरतानासुद्धा अडचणी येत होत्या. आता गुरुवारपासून पवित्र पोर्टल सुरू झाले आहे. त्यामुळे आतातरी जाहिराती दिसतील का, आणि उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता येईल का, असा प्रश्न इच्छुक उमेदवारांकडून उपस्थित करण्यात येत आहे. पवित्र पोर्टल सुरू झाल्यामुळे परीक्षा क्रमांकानुसार जाहिराती दिसणार आहेत. जाहिरात दिसल्यावर प्राधान्यक्रम भरता येईल. प्राधान्यक्रम न भरता आल्यास उमेदवारांसाठी २५ ते ३0 जून या कालावधीत सुविधा सुरू राहील. उमेदवारांना त्यांचे प्राधान्यक्रम डाउनलोड केल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा २५ ते ३0 पर्यंत उपलब्ध राहील. त्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी २0 जूनपर्यंत पोर्टलवर उपलब्ध जाहिरातींचा अभ्यास करूनच योग्य निर्णय घ्यावा. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाTeachers Recruitmentशिक्षकभरती