शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

३२ हजारांवर शेतकरी बाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 02:24 IST

कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ात थकबाकीदार शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. त्यामध्ये पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील १ लाख ९१ हजार १८७ थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, कर्जमाफीसाठी अपात्र ठरविण्यात आलेले २३ हजार ८६४ शेतकरी कर्जमाफीच्या लाभातून बाद झाले आहेत.

ठळक मुद्देकर्जमाफी जिल्हय़ात १ लाख ९१ हजार शेतकर्‍यांना मिळणार लाभ!

संतोष येलकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ात थकबाकीदार शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. त्यामध्ये पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील १ लाख ९१ हजार १८७ थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, कर्जमाफीसाठी अपात्र ठरविण्यात आलेले २३ हजार ८६४ शेतकरी कर्जमाफीच्या लाभातून बाद झाले आहेत.सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यंंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरण्याचे काम गत २४ जुलै ते २२ सप्टेंबर या कालावधीत पूर्ण करण्यात आले. त्यामध्ये जिल्हय़ात १ लाख ३८ हजार ९६२ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. त्यानंतर कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या गावनिहाय याद्यांचे चावडी वाचन करण्यात आले. त्यामध्ये कर्जमाफीच्या अर्जांंमधील माहितीची पडताळणी करण्यात आली, तसेच बँकांकडून थकबाकीदार शेतकर्‍यांचे ‘ऑडिट’ करण्यात आले. जिल्हय़ात थकबाकीदार, कर्जाची नियमित परतफेड करणारे आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेले एकूण २ लाख २४ हजार ५१ शेतकरी आहेत. त्यापैकी कर्जमाफीच्या अर्जांंची पडताळणी केल्यानंतर जिल्हय़ातील १ लाख ९१ हजार १८७ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या खातेदार शेतकर्‍यांचा समावेश आहे. उर्वरित ३२ हजार ८६४ शेतकर्‍यांना कर्जमाफीसाठी अपात्र ठरविण्यात आले. अपात्र ठरलेले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभातून बाद झाले आहेत.

७0 शेतकरी कुटुंबांचे कर्ज खाते  आज होणार ‘निल’! अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हय़ातील ७0 शेतकरी कुटुंबांना प्रतीकात्मक कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. कर्जमाफीची रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करून कर्ज खाते ‘निल’ करण्यात येणार आहे.

कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १ लाख १२ हजार ४0६ आणि राष्ट्रीयीकृत बँकांचे ७८ हजार ७८१ असे एकूण १ लाख ९१ हजार १८७ खातेदार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, तर राष्ट्रीयीकृत बँकांचे ३२ हजार ८६४ खातेदार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरले आहे. पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यास १८ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे.-जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था).

टॅग्स :Farmerशेतकरी