शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषदेचे काम करण्यास वकिलांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 14:13 IST

अकोला : जिल्हा परिषदेच्या विविध प्रकरणात न्यायालयात बाजू मांडण्यास पॅनलवर नियुक्त केलेल्या २४ पैकी चौघांनी काम करण्यास नकार दिला आहे.

ठळक मुद्देअकोला जिल्हा परिषदेची बाजू जिल्हा न्यायालयात मांडण्यासाठी २४ वकिलांना पॅनलवर नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र, काही वकिलांनी मोबदला वेळेत दिला जात नाही. अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. जिल्हा परिषदेची नवीन प्रकरणे घेण्यास नकार दिला. तर जुनी प्रकरणे त्या-त्या विभागाकडे हस्तांतरित केली.

अकोला : जिल्हा परिषदेच्या विविध प्रकरणात न्यायालयात बाजू मांडण्यास पॅनलवर नियुक्त केलेल्या २४ पैकी चौघांनी काम करण्यास नकार दिला आहे. दोघांनी प्रकृतीच्या कारणास्तव, तर दोघांनी कोणतेही कारण न देता विभागांची प्रकरणे परत केल्याची माहिती आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील एका वकिलाने प्रकृतीच्या कारणास्तव प्रकरणे परत केली आहेत.विविध न्यायालयीन प्रकरणात जिल्हा परिषदेची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडण्यासाठी पॅनलवर वकिलांची नियुक्ती केली जाते. त्यासाठी नियुक्त केलेल्या वकिलांना त्या-त्या कायद्यातील प्रॅक्टिसनुसार प्रकरणे हाताळण्यासाठी दिली जातात. अकोला जिल्हा परिषदेची बाजू जिल्हा न्यायालयात मांडण्यासाठी २४ वकिलांना पॅनलवर नियुक्ती देण्यात आली आहे. त्या वकिलांकडे विविध विभागाच्या न्यायालयीन प्रकरणांची कामे देण्यात आली आहेत. त्या प्रकरणात वकिलांना किती तारखांवर बाजू मांडली, पुरावे सादर केले, प्रकरण किती दिवस न्यायालयात चालले, या संपूर्ण बाबींचा उलगडा केसपेपरवरून होतो. त्यानुसार वकिलांना देय मोबदला अदा केला जातो. मात्र, काही वकिलांनी मोबदला वेळेत दिला जात नाही. अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत, या कारणास्तव जिल्हा परिषदेची नवीन प्रकरणे घेण्यास नकार दिला. तर जुनी प्रकरणे त्या-त्या विभागाकडे हस्तांतरित केली. मात्र, मोबदल्याच्या संदर्भात कोणतेही लिखित पत्र त्यांनी जिल्हा परिषदेला दिले नाही. केवळ प्रकरणे परत केली. त्यामध्ये अ‍ॅड. अजमतउल्ला खॉ लोधी, अ‍ॅड. पी.जे. देशमुख, अ‍ॅड. सत्यनारायण जोशी यांचा समावेश आहे. तर अ‍ॅड. एन.जे. फुरसुले यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आता तारखेवर उपस्थित राहणे शक्य नाही, असे पत्र देत काम थांबवले. विशेष म्हणजे, त्यापैकी एका वकिलाला लघुसिंचन विभागाने न्यायालयात बाजू मांडण्यास नकार देण्याचे कारण लेखी पत्र देत विचारले आहे. त्यावर अद्याप वकिलाकडून उत्तर आले नसल्याची माहिती आहे.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बाजू मांडण्यासाठी पॅनलवर असलेल्या सातपैकी अ‍ॅड. दत्तात्रय काशिनाथ दुबे यांनीही प्रकृतीच्या कारणास्तव काम थांबवत असल्याचे पत्र जिल्हा परिषदेला दिले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद