शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अत्याधुनिक यंत्र देईल कॅन्सरला मात; विदर्भात नागपूरनंतर अकोल्यात सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 13:16 IST

अकोला : कॅन्सरला मात देण्यासाठी येथील संत तुकाराम कॅन्सर इस्पितळामध्ये अत्याधुनिक रेडिएशन मशीन दाखल झाली आहे. विदर्भात नागपूरनंतर अकोल्यात ही सुविधा उपलब्ध झाल्याने शेकडो गरिबांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे.

अकोला : कॅन्सरला मात देण्यासाठी येथील संत तुकाराम कॅन्सर इस्पितळामध्ये अत्याधुनिक रेडिएशन मशीन दाखल झाली आहे. विदर्भात नागपूरनंतर अकोल्यात ही सुविधा उपलब्ध झाल्याने शेकडो गरिबांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे.रेडिएशनच्या माध्यमातून कॅन्सरवर उपचार होत असला, तरी हे रेडिएशन शरिरासाठी घातक आहे; परंतु या रेडिएशनचा उपयोग आवश्यक त्याच ठिकाणी झाल्यास रुग्णांना होणारा त्रास कमी होऊ शकतो. त्या अनुषंगाने गत दोन दिवसांपूर्वी संत तुकाराम कॅन्सर इस्पितळात ‘लिनॅक’ ही कॅन्सरची मशीन दाखल झाली. त्याचा थेट लाभ गोरगरीब रुग्णांना मिळणार असून, अनेकांचे प्राण वाचविण्यासही मदत होईल. यासाठी संत तुकाराम कॅन्सर इस्पितळातर्फे गत चार वर्षांपासून शासनाकडे अनुदानाची मागणी सुरू होती; मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले. अखेर सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून दोन दिवसांपूर्वीच ही मशीन अकोल्यात दाखल झाली. महिनाभरात या मशीनचा सेटअप तयार होणार असून, त्यानंतर ही मशीन रुग्णांच्या सेवेत येणार आहे. ही मशीन अत्याधुनिक असून, जिल्ह्यातीलच नव्हे, तर जवळपासच्या सर्वच कॅन्सरच्या रुग्णांसाठी जीवनदायीनी ठरणार आहे.असे आहेत मशीनचे वैशिष्ट्यफोटॉन व इलेक्ट्रॉन रेडिएशनहवेतील मॉल्युकॉल्सचा आधारलेझर गायडन्सकेवळ ट्युमरवरच रेडिएशनट्यूमरच्या आकारानुसार लेझर लाईट आकार बदलतो.एकाच दिवसात १२५ रुग्णांवर उपचारया मशीनच्या माध्यमातून कॅन्सरच्या १२५ रुग्णांवर एकाच दिवशी उपचार करणे शक्य होणार आहे. जलद गतीने उपचार होणार असल्याने कमी वेळेत जास्त रुग्णांना सेवा देणे शक्य होणार आहे. त्यामुळे बाहेर गावावरून येणाऱ्या रुग्णांना आर्थिक फटका बसणार नाही.मागील चार महिन्यांपासून शासनाकडे या मशीनसाठी पाठपुरावा केला; परंतु यश मिळाले नाही. सामाजिक दायित्व म्हणून संत तुकाराम कॅन्सर इस्पितळामध्ये ही मशीन अखेर दाखल झाली असून, याचा फायदा गोरगरीब रुग्णांना मिळणार आहे.- गिरीष अग्रवाल, संचालक, संत तुकाराम हॉस्पिटल संचालित संस्था, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcancerकर्करोग